Two women died in an accident while talking on the phone on the flyover of Santacruz-Chembur Link Road

कॉल रेकॉर्डिंग फिचर्स आजच्या काळात सर्वसामान्य झालं आहे, Android फोनमध्ये तर ही सुविधा सहजपणे उपलब्ध असते, अनेक मोबाईल कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनमध्य ही सुविधा पहिल्यापासून इनबिल्ट देतात. तर त्या Android फोनमध्ये ही सुविधा नसेल त्यांना Google Play Store मध्ये अनेक Apps आहेत, ज्यामुळे कॉल रेकॉर्डिंग करणे सोपे जाते. आज आम्ही तुम्हाला तुमचा कॉल रेकॉर्डिंग होत असेल तर कसे जाणून घ्यायचे याबाबत सांगणार आहोत.

    दिल्ली :  कॉल रेकॉर्डिंग फिचर्स आजच्या काळात सर्वसामान्य झालं आहे, Android फोनमध्ये तर ही सुविधा सहजपणे उपलब्ध असते, अनेक मोबाईल कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनमध्य ही सुविधा पहिल्यापासून इनबिल्ट देतात. तर त्या Android फोनमध्ये ही सुविधा नसेल त्यांना Google Play Store मध्ये अनेक Apps आहेत, ज्यामुळे कॉल रेकॉर्डिंग करणे सोपे जाते. आज आम्ही तुम्हाला तुमचा कॉल रेकॉर्डिंग होत असेल तर कसे जाणून घ्यायचे याबाबत सांगणार आहोत.

    • सर्वात महत्त्वाचे हे लक्षात असायला हवे की, कोणत्याही परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे हा एकप्रकारचा गुन्हा आहे, कोणत्याही व्यक्तीशी बोलत असताना त्या व्यक्तीच्या नकळत कॉल रेकॉर्ड करणे हे कलम 21 च्या विरोधात आहे. म्हणजेच, प्रत्येक व्यक्तीच्या गोपनीयतेचा आदर केला पाहिजे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार घटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत आयुष्यात मूलभूत हक्कांमधील गोपनीयतेचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणजेच, कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तिक कॉल रेकॉर्ड करणे म्हणजे गोपनीयतेचा हक्क भंग करणे होय.
    • जर कोणी खासगी संभाषण करत असेल आणि त्याचा कॉल रेकॉर्ड झाला तर त्या व्यक्तीसाठी मोठा धोका असतो, त्यामुळे तुम्ही कॉलवर बोलतेवेळी कॉल रेकॉर्ड होतोय का, याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्हाला व्हॉईल कॉलवेळी असे लक्षात येईल की, काही संकेद अथवा मिनिट्सनंतर बीपचा आवाज येत आहे तर समजून घ्या तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे. नेहमी व्हॉईस कॉल सुरू असताना बीपचा आवाज येत असेल तर तुमचा कॉल रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे.
    • कॉल रेकॉर्ड होतोय की नाही हे जाणून घेण्याचा दुसरा मार्ग म्हणजे, जर तुम्ही कोणाला कॉल केला आणि त्याने तुमचा कॉल स्पीकरवर टाकला तर समजून घ्या तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे, स्पीकरवर ठेवलेले व्हॉईस कॉल रेकॉर्ड होत असल्याचे समजणे खूप सोपे आहे. अशातच जर तुमचा कोणावर विश्वास नसेल आणि तो स्पीकरवर तुमच्याशी बोलतोय तर तुम्हाला कॉल रेकॉर्ड होत असल्याचे संकेत मिळतील.
    • तुम्ही कोणाशी फोनवर बोलताना दुसरा आवाज येत असेल तर ध्यानात घ्या कॉल रेकॉर्ड होतोय, अशा परिस्थितीत तुम्हाला मध्येमध्ये बाजूचा गोंधळ ऐकायला येईल, कॉल रेकॉर्ड होण्यापासून वाचण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. ऑनलाईन अनेक Apps आहेत, त्यात विना बीप आवाजाशिवाय कॉल रेकॉर्ड होतात, म्हणजे जर तुमचा कॉल रेकॉर्ड होत असेल तर त्यात कोणताही बीप आवाज येणार नाही.