signal becomes the top free app on app store in india check details nrvb
Signal भारतात ॲपस्टोरवर ठरलंय टॉप फ्री ॲप, WhatsApp लाही टाकलंय मागे

न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या अहवालानुसार, सेन्सर टॉवरच्या डेटावरून मिळालेल्या माहितीनुसार Signal ॲपला गेल्या दोन दिवसांत अँड्रॉइड आणि iOS डिव्हाइसेसमध्ये 100,000 हून अधिक लोकांनी डाऊनलोड केलं आहे. सोबतच अहवालात असंही नमूद केलं आहे की, २०२१ च्या पहिल्याच आठवड्यात व्हॉट्सॲपच्या नव्या इंस्टॉलेशनमध्ये ११ टक्क्यांनी घट झाली आहे.

WhatsApp ने आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही नवीन पॉलिसी ८ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. या नव्या पॉलिसीने व्हॉट्सॲप युजर डेटावर पूर्वीपेक्षा अधिक लक्ष ठेवणार आहे आणि हाच डेटा फेसबुकलाही शेअर करण्यात येणार आहे. या नव्या पॉलिसीला युजर्सला एक्सेप्ट करणं अनिवार्य आहे नाहीतर त्यांना आपलं अकाऊंट डिलीट करावं लागणार आहे. या दरम्यान Signal ॲपची लोकप्रियता वाढली आहे.

व्हॉट्सॲपच्या या नव्या पॉलिसीने व्हॉट्सॲप युजर्सची चिंता वाढवली आहे आणि आता लोकं प्रायव्हसी फोकस्ड ॲप Signal वर स्विच करत आहेत. आता हे ॲप भारतासह जगभरातील देशांत ॲपलच्या ॲप स्टोरमध्येही टॉप फ्री ॲप झालं आहे.

Signal ने ॲप स्टोरच्या टॉप फ्री ॲप्सच्या चार्टला ट्विट केलं आहे. यात आपल्याला पाहता येईल की, ॲप पहिल्या स्थानावर विराजमान झालं आहे. म्हणजे भारतात Signal ने WhatsApp ला मागे टाकत नंबर एकचं मानाचं स्थान पटकावलं आहे.

सोबतच जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिनलँड, हाँगकाँग, आणि स्वित्झर्लंडमध्येही सिग्नलने व्हॉट्सॲपला मागे टाकलं आहे. याशिवाय आपल्याला सांगू इच्छितो की, हंगेरी आणि जर्मनीत Signal गुगल प्ले स्टोरवर टॉप फ्री ॲप ठरलं आहे.

न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या अहवालानुसार, सेन्सर टॉवरच्या डेटावरून मिळालेल्या माहितीनुसार Signal ॲपला गेल्या दोन दिवसांत अँड्रॉइड आणि iOS डिव्हाइसेसमध्ये 100,000 हून अधिक लोकांनी डाऊनलोड केलं आहे. सोबतच अहवालात असंही नमूद केलं आहे की, २०२१ च्या पहिल्याच आठवड्यात व्हॉट्सॲपच्या नव्या इंस्टॉलेशनमध्ये ११ टक्क्यांनी घट झाली आहे.

Signal ची डाऊनलोडिंग अचानक वाढली आहे. कारण लोकं व्हॉट्सला पर्याय शोधत आहेत. Signalच्या अचानक वाढलेल्या लोकप्रियतेचं श्रेय एलॉन मस्क यांना दिलं जाऊ शकतं. कारण काही दिवसांपूर्वी त्यांनीच ‘यूज सिग्नल’ लिहून ट्विट केलं होतं. या ट्विटला ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनीही रिट्विट केलं होतं.