भन्नाट टेक्नॉलॉजी : त्वचा बनणार टचपॅड ; स्किनला टचपॅडमध्ये बदलणार स्मार्ट टॅटू

सेन्सरवाला हा टॅटू शरीरावर मोठ्या सहजतेने चिटकविता येणार आहे. एकदा स्किनवर टॅटू लावल्यानंतर तो मोबाईलच्या टचपॅडप्रमाणे काम करेल. ज्याप्रमाणे स्मार्टफोनमध्ये तुम्ही टच किंवा स्वाईप करतात, तसेच स्किनवर करता येणार आहे.

    गुगल एका अशा स्मार्ट टॅटूवर काम करीत आहे जो स्किनवर लावताच आपले शरीर टचपॅडमध्ये रूपांतरीत होईल. हे संपूर्ण काम एका सेन्सरच्या माध्यमातून करण्यात येईल. गुगल रिसर्च अंतर्गत होणाऱ्या या प्रोजेक्टच नाव स्किन मार्क्स असे ठेवण्यात आले आहे ज्यास तुम्ही शरीरावर टॅटूसारखे वापरू शकता. भविश्यात आता याच प्रकारची टेक्नॉलॉजी काम करेल.

    सहजतेने चिटकवले जाणार

    सेन्सरवाला हा टॅटू शरीरावर मोठ्या सहजतेने चिटकविता येणार आहे. एकदा स्किनवर टॅटू लावल्यानंतर तो मोबाईलच्या टचपॅडप्रमाणे काम करेल. ज्याप्रमाणे स्मार्टफोनमध्ये तुम्ही टच किंवा स्वाईप करतात, तसेच स्किनवर करता येणार आहे. टॅटूमध्येही असे करता येणार आहे. याशिवाय काही आणखी फीचर्स आहे जे टॅटूवाला टचपॅड करू शकतो. सेन्सरला ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्ही टॅटू असलेल्या जागेला थोडेसे घासू शकता किंवा तुमची बोटे किंवा अंगठे मोडल्यानंतर हा टॅटू ॲक्टिव्ह होईल.

    वैशिष्ट्ये

    तुमची त्वचार व अवयवांसोबत काम करण्याचा अर्थ आहे की, आप यास न बघताही काम करू शकता. हा टॅटू स्किन प्रिंटिंग शाईद्वारे बनविण्यात येते. काही प्रोटोटाइप टॅटूमध्ये कार्टून ड्रॉईंग किंवा लाईट अप डिस्प्ले सहभागी आहे. रिसर्चनुसार, टॅटूच्या रुंदीतील घट किंवा स्ट्रेचॅबिलिटी वाढल्यामुळे अनियमित भूमितीनुसार स्किन मार्क हवे तसा कमी व लवचिक होऊ शकतो.