घामाच्या साह्याने चार्ज होणार स्मार्टफोन; अमेरिकेतील वैज्ञानिकांनी शोधले अनोखे उपकरण

सर्वसाधारणपणे स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी विजेचा वापर गरजेचा असतो पण अमेरिकेतील वैज्ञानिकांनी अशा एका अनोख्या उपकरणाचा शोध लावला आहे की हे उपकरण जर बोटांवर लावले तर बोटांवर जमा झाल्याच्या घामाच्या साह्याने स्मार्टफोन चार्ज होऊ शकतो हे उपकरण हाताच्या बोटांवर लावणे आवश्यक आहे. रात्री झोपताना जर हे उपकरण बोटांवर लावले तर रात्रभर झोपेच्या कालावधी मध्ये जमा झालेल्या घामाच्या सहाय्याने स्मार्टफोन चार्ज होऊ शकतो कॅलिफोर्निया युनिवर्सिटी येथील संशोधकांनी हे अनोखे उपकरण तयार केले आहे.

    वाशिंग्टन : सर्वसाधारणपणे स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी विजेचा वापर गरजेचा असतो पण अमेरिकेतील वैज्ञानिकांनी अशा एका अनोख्या उपकरणाचा शोध लावला आहे की हे उपकरण जर बोटांवर लावले तर बोटांवर जमा झाल्याच्या घामाच्या साह्याने स्मार्टफोन चार्ज होऊ शकतो हे उपकरण हाताच्या बोटांवर लावणे आवश्यक आहे. रात्री झोपताना जर हे उपकरण बोटांवर लावले तर रात्रभर झोपेच्या कालावधी मध्ये जमा झालेल्या घामाच्या सहाय्याने स्मार्टफोन चार्ज होऊ शकतो कॅलिफोर्निया युनिवर्सिटी येथील संशोधकांनी हे अनोखे उपकरण तयार केले आहे.

    त्यामध्ये एक इलेक्ट्रिकल कंडक्टर लावला आहे आणि कार्बन फोमचा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे बोटांवर जमा झालेला घाम शोषला जातो कंडक्टर वर जमा झालेले एंजाइम आणि घामाचे कण याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन वीज निर्माण होते. कंडक्टरच्या खाली एक छोटी चीप लावण्यात आली आहे ही चिप दाबली की वीज जनरेट होण्यास सुरुवात होते.

    संशोधक लिन यु यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या उपकरणाचा आकार फक्त एक चौरस सेंटिमीटर एवढा आहे वापरण्यात आलेले मटेरियल फ्लेक्सिबल स्वरूपाचे आहे उपकरण जरी बोटांवर लावण्यात आले तर त्याची कोणतीही जाणीव होत नाही त्याच्या साहाय्याने अगदी थोड्या थोड्या प्रमाणात विजेची निर्मिती होत असल्यामुळे 3 आठवडे जर हे उपकरण बोटांवर लावले तर मोबाईल संपूर्णपणे चार्ज होऊ शकतो या उपकरणावर आणखी संशोधन करून त्याची चार्ज करण्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे बोटांवर सर्वांत जास्त घाम निर्माण होत असल्याने हे उपकरण फक्त बोटांवर लावण्यात येते अशी माहिती संशोधकांनी दिली आहे.