पृथ्वीच्या महासागराच्या तळाचा एक पंचमांश नकाशा तयार करण्यात यश

-त्सुनामी तसेच भरती ओहोटी संबंधित माहिती मिळण्यास मदत होणार मानवाने पृथ्वीवरील महासागरापेक्षा अंतराळातील ग्रह, उपगृहे , चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक माहिती मिळविली आहे.

-त्सुनामी तसेच भरती ओहोटी संबंधित माहिती मिळण्यास मदत होणार

मानवाने पृथ्वीवरील महासागरापेक्षा अंतराळातील ग्रह, उपगृहे , चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक माहिती मिळविली आहे. मात्र आता  संशोधकांना पृथ्वीच्या महारासागरातील तळाचा धांडोळा घेण्यास सुरुवात केली असून त्यांना महासागराच्या तळाची एक पंचमांश खोली  मोजण्यात यश मिळाले आहे. त्यानुसार या तळाचा नकाशा बनविण्यात आला असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ‘सीबेड २०३०’ या प्रोजेक्टच्या रिपोर्टनुसार सुमारे १९ टक्के समुद्राच्या तळापर्यंत संशोधन झाले आहे. या संशोधनात जवळजवळ ५. ६ दशलक्ष चौरस मैलांच्या तळापर्यंतचा  डेटा गोळा करण्यात आला आहे. मोजण्यात आलेली महासागराची खोली  साधारपणे  ऑस्ट्रेलियाच्या आकारापेक्षा जवळपास दुप्पट आहे, असे सीबेड २०३० अहवालानुसार सांगण्यात आले आहे. .

महासागराच्या तळाच्या अभ्यासासाठी  ‘निप्पॉन फाउंडेशन-जनरल बॅथीमेट्रिक चार्ट ऑफ द ओशन’ हा प्रकल्प २०१७ मध्ये सुरू करण्यात आला. त्यावेळी केवळ ६ टक्के समुद्रतळाची माहिती होती. आता त्यात १९ टक्क्यांची भर पडली आहे. तसेच पुढील दहा वर्षांत म्हणजे २०३० पर्यंत उर्वरित ८०-८१ टक्के भागाचा नकाशा तयार करण्याचे आव्हान आहे. या संशोधनासाठी उपग्रहांपासून पाण्याखाली जाऊ शकणाऱ्या रोबोंपर्यंत विविध उपकरणांची मदत यासाठी घेण्यात आली आहे. या प्रकल्पात जगभरातील अनेक देशांचा सहभाग आहे. 

काय आहे सीबेड २०३० प्रोजेक्ट 

-पाण्याखाली ड्रोन, व्यापारी जहाजे, मासेमारी करणार्‍या नौका तसेच संशोधकांनी ​गोळा केलेली माहिती यांच्याकडून प्राप्त होणार्‍या सर्व माहितीला गोळा करून एक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे.

-‘सीबेड प्रोजेक्ट २०३०’ च्या योजनेनुसार २०३० सालापर्यंत जगभरात पसरलेल्या समुद्रतळाचा एक विस्तृत नकाशा तयार करण्यात येणार आहे.

-जपानची संस्था निप्पॉन फाउंडेशन आणि जनरल बॅथीमेट्रिक चार्ट ऑफ द ओशन (GEBCO) यांच्या सहयोगाने हा प्रकल्प राबवविला जाणार आहे.

प्रकल्पाचा हेतू 

-पाण्याखाली असलेल्या २०० दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळाबाबत अजूनही माहिती उपलब्ध नाही.

-हे क्षेत्र म्हणजे २०० मीटरच्या खोलीसह जगभरातल्या महासागरांचा जवळपास ९३% भाग आहे.

-या अभ्यासामुळे त्सुनामी लहरींची पद्धत, प्रदूषण, मासेमारी, नौकायन सुचालन आणि अज्ञात खनिजांचे साठे अश्या बाबींवर प्रकाश पडण्यास मदत होईल.

पाण्याखालून केबल्स आणि पाइपलाइन टाकण्यासाठी  तसेच पाण्याखालील जीवसृष्टीची माहिती मिळविण्यासाठी याची मदत होईल. 

-या उपक्रमाला डच कंपनी फूग्रो यांचा पाठिंबा मिळालेला आहे. फूग्रोने ६५,०००चौ. किलोमीटरची माहिती गोळा केलेली आहे.

-ओशन इन्फिनिटी या कंपनीनेही आपला पाठिंबा दिलेला आहे. या दोन्ही कंपन्यांनी मलेशियाच्या कोसळलेल्या MH३७० विमानाच्या अपघाताचा शोध घेतला होता.