ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ; नौदलाच्या सामर्थ्यात वाढ

दिल्ली :  भारताने रविवारी नौदलाच्या नौदलाच्या स्वदेशी स्टील्थ डिस्ट्रॉयर आयएनएस चेन्नईवरुन ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. आयएनएस चेन्नईवरुन ब्रह्मोसने अरबी समुद्रातील लक्ष्याच्या यशस्वी लक्ष्यभेद केला. डीआरडीओने ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती दिली आहे. प्रतिकूल हवामानात दिवसा आणि रात्रीही जमीनीवरील, समुद्रातील आणि हवेतील लक्ष्यभेद करण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची असल्याने भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात वाढ झाली आहे.

भारताची शस्त्रास्त्र सज्जता

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी यशस्वी प्रक्षेपणासाठी डीआरडीओ, ब्रह्मोस आणि भारतीय नौदलाला शुभेच्छा दिल्या. चीनशी असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आपले लष्करी सामर्थ्य वाढवत आहे. त्यात रविवारी यशाची आणखी एक पायरी गाठली आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारताच्या लढाऊ जहाजांची सुरक्षा वाढणार आहे. याआधी डीआरडीओने ओडिशातील चांदीपूरमध्ये ३० सप्टेंबरला ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. ब्रह्मोस देशातील पहिले सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचा वापर पाणबुडी, लढाऊ जहाजे, लढाऊ विमाने आणि जमीनीवरूनही करता येणार आहे. हे क्षेपणास्त्र भारत आणि रशियाने संयुक्त उपक्रमाद्वारे विकसीत केले आहे. डीआरडीओचे चेअरमन जी. सतीश रेड्डी यांनी या कामगिरीसाठी डीआरडीओचे शास्त्रज्ञ आणि सर्व कर्मचारी, ब्रह्मोस, भारतीय नौदल आणि कारखान्यांचे कौतुक केले आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रामुळे अनेक भारतीय शस्त्रास्त्र सज्जतेत महत्त्वाची भर पडेल, असे ते म्हणाले.

ब्रह्मोसची मारक क्षमता

सुरुवातीला या क्षेपणास्त्राची मारक क्षमता २९०किलोमीटरपर्यंत होती. ती वाढवून ४०० किलोमीटरपेक्षा जास्त करण्यात आली आहे. ४०० किलोमीटरच्या क्षेत्रातील शत्रूच्या लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता क्षेपणास्त्रात आहे. चीनशी असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या चीनला लागून असलेल्या सीमेजवळ ब्रह्मोससह इतर शस्त्रास्त्रे तैनात ठेवण्यात आली आहेत. भारत-चीनमध्ये तणाव असताना भारताला मोठे यश मिळाले आहे.