पाकिस्तानने कधी नव्हे ते केलंय १ नंबर काम; दिलाय चीनला दणका, Tiktok वर घातलीये बंदी

पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने याआधीदेखील टिकटॉकला अश्लील व्हिडिओबाबत समज दिली होती. अश्लील व्हिडिओवर कारवाई करण्याची सूचनाही प्राधिकरणाने दिली होती. मात्र, त्यावर ठोस कारवाई न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे म्हटले जाते.

    वृत्तसंस्था, इस्लामाबाद.

    चीनचा मित्र असलेल्या पाकिस्ताननेही चीनला धक्का दिला आहे. चिनी कंपनी बाइटडान्सला पाकिस्तान सरकारने दणका दिला असून Tiktok वर बंदी घातली आहे. टिकटॉकने पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे ही बंदी घालण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.

    पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने याआधीदेखील Tiktok ला अश्लील व्हिडिओबाबत समज दिली होती. अश्लील व्हिडिओवर कारवाई करण्याची सूचनाही प्राधिकरणाने दिली होती. मात्र, त्यावर ठोस कारवाई न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे म्हटले जाते.

    टिकटॉकला कारवाई करण्यासाठी पुरेसा वेळही देण्यात आला होता. मात्र, त्यांनी पावले न उचलल्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. प्राधिकरणासमोर येऊन टिकटॉकने त्यांच्या ॲपवरून अश्लील व्हिडिओबाबत कार्यवाही कशी करणार, त्याचे धोरण काय असणार आदींबाबत माहिती दिल्यास बंदी मागे घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.