TCL ने भारतात लाँच केले 3 स्मार्ट MINI LED TV; जाणून घ्या फीचर्स

या टीव्हीचा डिस्प्ले 1000 निट्स पीक ब्राइटनेस आणि एक अब्ज कलर्सना सपोर्ट करतो. या अँड्रॉइड 11 आधारित स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी विजन HDR देण्यात आला आहे. यातील 120 हर्ट्ज एमईएमसी सपोर्ट लो फ्रेम रेट असलेले व्हिडिओज देखील हाय फ्रेम रेटमध्ये दाखवू शकतो. यात HDMI 2.1 सह गेम मास्टर फिचर देण्यात आला आहे.

    TCL ने भारतात नवीन 2021 C स्मार्ट टीव्ही सीरीज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये C825, C728 आणि C725 असे तीन टीव्ही मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत.  या टीव्हीमध्ये एक मॅजिक कॅमेरा देण्यात आला आहे. TCL C825 भारतातील पहिला मिनी-एलईडी 4K टीव्ही आहे. चांगली पिक्चर क्वालिटी देण्यासाठी टीसीएल C825 मध्ये हजारो मिनी एलईडी देण्यात आले आहेत.

    या टीव्हीचा डिस्प्ले 1000 निट्स पीक ब्राइटनेस आणि एक अब्ज कलर्सना सपोर्ट करतो. या अँड्रॉइड 11 आधारित स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी विजन HDR देण्यात आला आहे. यातील 120 हर्ट्ज एमईएमसी सपोर्ट लो फ्रेम रेट असलेले व्हिडिओज देखील हाय फ्रेम रेटमध्ये दाखवू शकतो. यात HDMI 2.1 सह गेम मास्टर फिचर देण्यात आला आहे.

    या स्मार्ट टीव्हीमध्ये 1080P मॅग्नाटिक मॅजिक कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर आयमॅक्स एन्हान्सड सर्टिफाइड 2.1 इंटीग्रेटेड ONKYO साउंडबार, डॉल्बी अ‍ॅटमॉस असे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. TCL C825 चा 55-इंच मॉडेल 1,14,990 रुपये आणि 65-इंच मॉडेल 1,49,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.