उत्सुकता शिगेला! Apple iphone 13चं काऊंटडाऊन Start…काही तास शिल्लक, पाहा कधी आणि कुठे?

Apple ने आपल्या आगामी इव्हेंटची घोषणा केली आहे. हा Apple event येत्या 14 सप्टेंबरला कॅलिफोर्निया येथील अ‍ॅप्पल पार्कमध्ये आयोजित करण्यात आला आहे. याची सुरूवात 10:00 a.m. PDT म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी होईल.

    टेक दिग्गज Apple कंपनीने आपल्या नव्या लाँच इव्हेंटची घोषणा केली आहे. हा इव्हेंट येत्या 14 सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. कंपनीने या इव्हेंटला ‘California Streaming’ असे नाव दिले आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून बहुप्रतीक्षित iPhone 13 series सादर होऊ शकते.

    Apple ने आपल्या आगामी इव्हेंटची घोषणा केली आहे. हा Apple event येत्या 14 सप्टेंबरला कॅलिफोर्निया येथील अ‍ॅप्पल पार्कमध्ये आयोजित करण्यात आला आहे. याची सुरूवात 10:00 a.m. PDT म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी होईल.

    अ‍ॅप्पलने 14 सप्टेंबरला होणाऱ्या लाँच इव्हेंटची माहिती दिली आहे. परंतु कंपनीने या इव्हेंटमध्ये कोणकोणते प्रोडक्टस लाँच होतील याची माहिती दिली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या इव्हेंटमधून आयफोन 13 सीरीज अंतगर्त iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मॉडेल सादर केले जाऊ शकतात. तसेच कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून iPhone 13 series चा लाँच इव्हेंट भारतीयांना देखील बघता येईल.