टेक्‍नोकडून नवीन ब्‍लॉकबस्‍टर स्‍पार्क गो २०२१ सादर; स्‍पेशल लाँच किंमत ६६९९ रूपये

७२९९ रूपये किंमत असलेला स्‍पार्क गो २०२१ अस्‍पायरेशनल भारतच्‍या मनोरंजन गरजांची पूर्तता करेल आणि स्‍पार्क गो सिरीजच्‍या यशाची पुनरावृत्ती करण्‍याची अपेक्षा आहे.

  • ब्‍लॉकबस्‍टर स्‍मार्टफोनचे सुधारित डिझाइन, आकर्षक व उच्‍च दर्जाच्‍या वैशिष्‍ट्यांसह नवीन अवतारामध्‍ये पुनरागमन
  • ७ जुलै २०२१ दुपारी १२ वाजल्‍यापासून स्‍पेशल लाँच किंमत ६६९९ रूपयांमध्‍ये (फक्‍त मर्यादित स्‍टॉकसाठी) ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्‍ध
  • या कालावधीनंतर स्‍पार्क गो २०२१ ची किंमत ७२९९ रूपये असेल

नवी दिल्‍ली : टेक्‍नो या जागतिक प्रिमिअम स्‍मार्टफोन ब्रॅण्‍डने आज गेल्‍या वर्षीचा ब्‍लॉकबस्‍टर डिवाईस ‘स्‍पार्क गो २०२०’चे सुधारित व्‍हर्जन ‘स्‍पार्क गो २०२१’च्‍या लाँचची घोषण केली. हे उत्‍पादन परिवर्तनाच्‍या दिशेने वाटचाल करत असलेल्‍या ‘ग्रेटर भारत’च्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. ते महत्त्वाकांक्षी, मूल्‍याचा शोध घेणारे ग्राहक आहेत, ज्‍यांना किफायतशीर दरामध्‍ये प्रिमिअम वैशिष्‍ट्यांचा अनुभव पाहिजे.

७२९९ रूपये किंमत असलेला स्‍पार्क गो २०२१ अस्‍पायरेशनल भारतच्‍या मनोरंजन गरजांची पूर्तता करेल आणि स्‍पार्क गो सिरीजच्‍या यशाची पुनरावृत्ती करण्‍याची अपेक्षा आहे.

‘सेगमेंट फर्स्‍ट’ या मुलभूत उत्‍पादन तत्त्वाशी बांधील राहत स्‍पार्क गो २०२१ने पुन्‍हा एकदा ८ हजारहून कमी किंमतीच्या विभागामध्‍ये सुधारित फोटोग्राफी अनुभवासाठी ८ मेगापिक्‍सल सेल्‍फी कॅमेरा व १३ मेगापिक्‍सल एआय ड्युअल रिअर कॅमेरा अशा विभागाला परिभाषित करणाऱ्या वैशिष्‍ट्यांसह व्‍यापक मनोरंजनाची सुविधा दिली आहे.

या डिवाईसमध्‍ये ५००० एमएएच बॅटरी, ६.५२ इंच डिस्‍प्‍ले आणि अद्वितीय ऑडिओ-शेअरिंग वैशिष्‍ट्य आहे, जे युजरला एकाच वेळी स्‍मार्टफोनला दोन ब्‍ल्‍यूटूथ इअरफोन्‍सशी किंवा तीन ब्‍ल्‍यूटूथ स्‍पीकर्सशी जोडण्‍यामध्‍ये मदत करते. ज्‍यामुळे मनोरंजनाचा स्‍तर उंचावत ते कुटुंब व मित्रांसोबत संस्‍मरणीय क्षणांचा आनंद घेऊ शकतात.

या लाँचबाबत बोलताना ट्रान्झिशन इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरिजीत तालापात्रा म्‍हणाले, ”टेक्‍नोचे १० दशलक्ष आनंदी ग्राहकांचा टप्‍पा गाठण्‍याचे यश देशभरातील ग्राहकांमधील आमच्‍या लोकप्रियतेला सिद्ध करते. आम्‍हाला माहित आहे की, आम्‍ही योग्‍य उत्‍पादने सादर केली आहेत आणि योग्‍य मागण्‍यांची पूर्तता केली आहे. स्‍पार्क सिरीजने आकर्षक दरांमध्‍ये बॅटरी, डिस्‍प्‍ले व कॅमेरा विभागांमध्‍ये प्रबळ भूमिका साकारण्‍यासोबत ८ हजारहून कमी किंमतीच्या स्‍मार्टफोन्‍समधील ट्रेण्‍डमध्‍ये बदल करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, स्‍पार्क गो २०२१ स्‍मार्टफोन स्‍पार्क सिरीजच्‍या विजयी घौडदौड कायम ठेवेल आणि अधिक पुढे जात राहिल. काऊंटरपॉइण्‍ट अहवालानुसार स्‍पार्क सिरीजला मिळालेल्‍या यशामुळे टेक्‍नोने ५,००० रूपये ते १०,०००० रूपये विभागातील ‘टॉप ५ स्‍मार्टफोन ब्रॅण्‍ड्स’ क्‍लबमधील स्‍थान अधिक प्रबळ केले आहे.”

स्‍पार्क गो २०२१ ची ठळक वैशिष्‍ट्ये: Features

३६ दिवसांचा स्‍टॅण्डबाय असलेली विशाल ५००० एमएएच बॅटरी

स्‍पार्क गो २०२१ मध्‍ये विशाल ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. ज्‍यामुळे दररोज विनाव्‍यत्‍यय स्‍मार्टफोनचा दीर्घकाळापर्यंत वापर करता येतो. ही बॅटरी एका चार्जमध्‍ये ३६ दिवसांचा स्‍टॅण्‍डबाय टाइम देते. तसेच २७ तासांचा कॉलिंग टाइम, १९ तासांचा ब्राऊजिंग टाइम, २१ तासांचा व्हिडिओ प्‍लेबॅक, १४ तासांचा गेम प्‍लेइंग आणि १४५ तासांच्या म्‍युझिक प्‍लेबॅकची देखील खात्री देते.

विभागातील ६.५२ इंची सुपर बिग स्क्रिनवर विशाल आकारात मनोरंजनाचा आनंद

स्‍पार्क गो २०२१ मध्‍ये सर्वोत्तम व्‍युइंग अनुभवासाठी ६.५२ इंची डॉट नॉच डिस्‍प्‍लेसह ८९.७ टक्‍के स्क्रिन टू बॉडी रेशिओ, ४८० नीट्स, ७२० x १६०० रिझॉल्‍युशन आणि २०:९ ॲस्‍पेक्‍ट रेशिओ आहे.

स्‍मार्टफोनमध्‍ये आकर्षक डिझाइन, ग्‍लॉसी फिनिश व २.५ डी ग्‍लास आहे, ज्‍यामधून आरामदायी व मजबूत ग्रिपसोबत स्‍मार्टफोनला प्रिमिअम लुकची खात्री मिळते.

सुधारित फोटोग्राफी अनुभवासाठी विशाल १३ मेगापिक्‍सल ड्युअल रिअर कॅमेरा

स्‍पार्क गो २०२१ मध्‍ये १३ मेगापिक्‍सल एआय ड्युअल रिअर कॅमेरासह एफ१.८ अर्पेचर, ४ X झूम आणि ड्युअल फ्लॅशलाइट आहे. ज्‍यामुळे अंधुक प्रकाशात देखील प्रोफेशनलप्रमाणे फोटोग्राफ्स काढता येतात. व्‍यापक अर्पेचरमुळे अधिक सुस्‍पष्‍ट फोटो येण्‍याची खात्री मिळते. कॅमे-यामध्‍ये १८ ऑटो सीन डिटेक्‍शन मोड्स- जसे एचडीआर, नाइट पोर्ट्रेट, बॅकलाइट पोर्ट्रेट आणि एआय समर्थित बॅकग्राऊण्‍ड बोकेह इफेक्‍ट आहेत.

मायक्रोस्लिट फ्रण्ट फ्लॅश असलेला विशाल ८ मेगापिक्‍सल सेल्‍फी कॅमेरा

टेक्‍नो स्‍पार्क गो २०२१ मधील सेल्‍फी कॅमेऱ्यामध्‍ये ८ मेगापिक्‍सल एआय फ्रण्‍ट कॅमे-यासह एफ२.० अर्पेचर आहे. मायक्रो स्लिट फ्रण्‍ट फ्लॅशवर ॲडजस्‍टेबल ब्राइटनेस अंधुक प्रकाशात देखील परिपूर्ण, सुस्‍पष्‍ट सेल्‍फीज कॅप्‍चर करते. परिपूर्ण ग्रुप सेल्‍फी काढण्‍यासाठी सेल्‍फी कॅमे-यामध्‍ये एआय ब्‍युटी मोड, एआय पोर्ट्रेट मोड आणि वाइड सेल्‍फी मोड आहे.

सुरक्षित युजर अनुभवासाठी उत्तम सुरक्षितता

टेक्‍नो स्‍पार्क गो २०२१ मध्‍ये इन-बिल्‍ट फेस अनलॉक २.० आणि स्‍मार्ट फिंगरप्रिंट सेन्‍सर आहे, जे युजरचा डेटा व गोपनीयतेचे संरक्षण करते. फेस अनलॉक २.० फोन दुस-याकडून सुरू करण्‍यापासून संरक्षण करते आणि सूर्यप्रकाशामध्‍ये डिस्‍प्‍ले सुस्‍पष्‍टपणे दिसण्‍याची खात्री देते. स्‍मार्ट फिंगरप्रिंट सेन्‍सर फोनला फक्‍त ०.२ सेकंदांमध्‍ये अनलॉक करते.

ऑडिओ शेअरसह अधिक प्रमाणात शेअर करा

स्‍पार्क गो २०२१ मध्‍ये अद्वितीय ऑडिओ शेअर वैशिष्‍ट्य देखील आहे, जे एकाचवेळी फोनला २ ब्‍ल्‍यूटूथ इअरफोन्‍स किंवा ३ ब्‍ल्‍यूटूथ स्‍पीकर्सशी कनेक्‍ट होण्‍याची सुविधा देते. ज्‍यामुळे तुम्‍ही विभिन्‍न व्‍हॉल्‍युम कंट्रोलसह कुटुंब व मित्रांसोबत चित्रपट पाहण्‍याच्‍या व संगीत ऐकण्‍याच्‍या मनोरंजनाचा भरपूर आनंद घेऊ शकता.

पैशांचे मोल

टेक्‍नो ग्राहकांना परिपूर्ण ‘स्‍मार्टफोन अनुभव’ देण्‍यासाठी आपल्‍या क्षमतांमध्‍ये सातत्‍याने वाढ करत आहे. टेक्‍नो स्‍पार्क गो २०२१ हा ७२९९ रूपये इतक्‍या किफायतशीर दरामधील परिपूर्ण ‘व्‍हॅल्‍यू पॅकेज’ आहे. हा ‘ऑल-राऊंडर’ स्‍मार्टफोन मोफत १०० दिवस एक-वेळ स्क्रिन रिप्‍लेसमेंट आणि १२ महिन्‍यांच्‍या वॉरण्‍टीच्‍या अद्वितीय ब्रॅण्‍ड वचनासह येतो. नवीन डिवाईस २जीबी + ३२ जीबी स्‍टोरेज क्षमतेसह होरिझोन ऑरेंज, मालदीव्‍ह्ज ब्‍ल्‍यू आणि गॅलॅक्‍सी ब्‍ल्‍यू या तीन आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे.