आशिया खंडात वाढले टेलिग्रामचे सब्सक्रायबर्स, संख्या 50 कोटींच्या पार

गेल्या ७२ तासां(Hours)त २.५ कोटी नवे युजर्स (Telegram New Users) जोडले गेले आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात (First Week of January) त्याने एकूण सब्सक्रायबर्स ५० कोटींच्या टप्पा पार केला असून ही संख्या सातत्याने वाढते आहे. तथापि, कंपनी (Company) ने भारता (India) तून तिला किती युजर्स मिळाले आहेत ही आकडेवारी स्पष्ट केलेली नाही.

नवी दिल्ली : मेसेंजिंग सेवा क्षेत्रातील कंपनी टेलिग्राम (Messaging service provider company Telegram) चे सब्सक्रायबर्स (Subscribers) ची संख्या आशिया खंडात 50 कोटी (50 Crores) च्या पार गेली आहे. प्रतिस्पर्धी व्हॉट्सॲपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी (Privacy Policy) वरून सुरू असलेल्या वादानंतर टेलिग्रामचे युजर्स (Telegram Users) अलीकडेच काही दिवसांत वेगाने वाढले आहेत.

टेलिग्रामने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 72 तासां(Hours)त 2.5 कोटी नवे युजर्स (Telegram New Users) जोडले गेले आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात (First Week of January) त्याने एकूण सब्सक्रायबर्स 50 कोटींचा टप्पा पार केला असून ही संख्या सातत्याने वाढते आहे. तथापि, कंपनी (Company) ने भारता (India) तून तिला किती युजर्स मिळाले आहेत ही आकडेवारी स्पष्ट केलेली नाही.

नवीन युजर्सपैकी 38 टक्के युजर्स हे आशिया खंडातील आहेत असं कंपनीने नमूद केलं आहे. याशिवाय युरोप (Europe)मधून 27 टक्के, लॅटिन अमेरिके (Latin America) तून 21 टक्के आणि पश्चिम आशिया (West Asia) व उत्तर आफ्रिके (North Africa) तून आठ टक्के नवीन युजर्स मिळाले आहेत.

सेंसर टॉवरच्या आकडेवारीच्या हवाल्याने काही बातम्यांमध्ये म्हटलं आहे की, भारतात 6 जानेवारी पासून ते 10 जानेवारी दरम्यान टेलिग्रामला 15 लाख नवीन डाऊनलोड मिळाले आहेत. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा दूरसंचार बाजार आणि डेटाचा सर्वात मोठा उपभोक्ता आहे. देशात 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत एकूण 117 कोटी टेलिफोन कनेक्शन्स होते यात 115 कोटी मोबाइल कनेक्शन्सचा सामावेश होता.