जगप्रसिद्ध लोणारच्या सरोवराच्या  गुलाबी पाण्याचे कुतूहल नासालाही ; अंतराळातून घेतले फोटो

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय झाला आहे. या सरोवराचे पाणी अचानक गुलाबी झाल्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.उल्कापातामुळे तयार झालेल्या या सरोवराचे पाणी एरवी

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय झाला आहे. या सरोवराचे पाणी अचानक गुलाबी झाल्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.उल्कापातामुळे तयार झालेल्या या सरोवराचे पाणी एरवी हिरव्या रंगाचं असतं मात्र हे पाणी पहिल्यांदाच गुलाबी झाल्याचे समाजताच ‘नासा’नेही या सरोवराचे फोटो अंतराळातून घेत प्रसिद्ध केले आहेत. अमेरिकेच्या नासाच्या लँडसॅट या उपग्रहानं ही दृश्यं टिपली आहेत. लँडसॅटने घेतलेल्या २५ मे आणि १०  जूनच्या फोटोंमध्ये लोणार सरोवराच्या पाण्यातील फरक स्पष्टपणे दिसत आहे.

लोणार सरोवराचा इतिहास 

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे सुमारे पन्नास  हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झाले आहे.  काळा पाषाणात (बेसॉल्ट खडक) अशा प्रकारे तयार झालेले हे आशिया खंडातील पहिले आणि जगातील तिसरे सरोवर आहे.   क्षारयुक्त पाणी याचे वैशिट्य आहे.ब्रिटिश अधिकारी जेई अलेक्झांडर याने सरोवर परिसराचा समावेश १८२३ साली विशेष भौगोलिक ठिकाणांमध्ये केला. 

पाण्याचा रंग गुलाबी का झाला ?

लोणार सरोवरातील पाण्याची क्षारता अधिक आहे. या सरोवराच्या पाण्यात  क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने ते अल्कधर्मीय आहे. अल्कधर्मीय हे  ‘PH ‘ या घटकावरून समजते. ७ – ७.५ च्या आसपास पीएच म्हणजे सामान्य पाणी. पीएच सातपेक्षा कमी असल्यास आम्लधर्मीय, तर ७.५ च्या पुढे पीएच असलेले पाणी अल्कधर्मीय असते. लोणारचा पीएच १४ पेक्षाही अधिक होता. मात्र आता  तो १०.५ च्या आसपास गेला असल्याने, अशी सरोवरे गुलाबी होऊ शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच उन्हाळ्यामुळे झरे आटणे , कमी पाऊस  कारणांमुळे  सरोवरातील पाणी कमी होत आहे आणि  क्षारयुक्त पाणी वाढल्याने बिटा कॅरोटीन रंगद्रव्य तयार होऊन पाण्याचा रंग बदलत असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.