आज २०२१ वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार , ‘Ring of Fire’ चे दृश्य ; अशी असेल वेळ ?

हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, हिंदी महासागर आणि अंटार्क्टिका या भागातूनच पाहता येऊ शकते. देशा-विदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी लोक थेट वेबकॅमेराद्वारे हे सूर्यग्रहण पाहू शकतो. नासा या सूर्यग्रहणाचे लाईव्ह स्ट्रिमिंग करणार आहे. gov/live वर तुम्ही हे सूर्यग्रहणाचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकता किंवा ल्युक बोलार्डच्या सौजन्य रॉयल एस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ कॅनडा सडबरी सेंटरवरच्या यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता.

  भारतात आज २०२१ वर्षातील पहिले सूर्यग्रहण दिसणार आहे. नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (नासा) च्या मते, चंद्राने उत्तर गोलार्ध ओलांडल्यानंतर हे सूर्यग्रहण पाहता येणार आहे. सूर्यग्रहणादरम्यान चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या अगदी मधोमध येणार असल्याने तीन खगोलीय ग्रह एकमेकांच्या अगदी समोरासमोर असल्याने काही भागात सूर्य प्रकाशास पूर्णपणे किंवा अंशतः दिसेल.

  परंतु हे सूर्यग्रहण भारतात सर्वच ठिकाणी पाहता येणार नाही. हे सूर्यग्रहण वर्तुळाकार सूर्यग्रहण असणार आहे. यामुळे चंद्र पृथ्वीपासून कितीही दूर असला तरी आकाशात तो सूर्याच्या तुलनेत खूप छोटा दिसणार आहे. भारतात फक्त लडाख आणि अरुणाचल प्रदेशातच हे सूर्यग्रहण पाहायला मिळेल. दुपारी १:४२ वाजल्यापासून सुरू होणारे हे सूर्यग्रहण संध्याकाळी ६:४१ मिनिटांनी संपेल. यांची महत्त्वाची वेळ ही ४:१६ वाजल्याच्या आसपास असेल. यावेळी सूर्य आणि चंद्र दोघे वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून २५ डिग्रीवर एकमेकांसोबत दिसणार आहे.

  हे सूर्यग्रहण ‘रिंग ऑफ फायर’ सारखे दिसणार आहे. १० जून म्हणजेच आज दिसणारे सूर्यग्रहण हे विशेष आहे. कारण शनि जयंती बरोबर १४८ वर्षांनंतर दिसणारे हे पहिले सूर्यग्रहण आहे. यापूर्वी २६ मे १८७३ साली शनि जयंती दिवशी सूर्यग्रहण दिसले होते. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (नासा) च्या म्हणण्यानुसार, १० जूनला म्हणजेच आज दिसणारे सूर्यग्रहण ‘रिंग ऑफ फायर’ सारखे दिसणार आहे. यावेळी चंद्रची पृथ्वीवर पोहोचणारी सूर्याची किरणे अडवून ठेवणार आहे. ‘रिंग ऑफ फायर’ ला वलयाकर सूर्यग्रहण असेही म्हटले जाते.

  जेव्हा चंद्र त्याच्या सावलीत सूर्याचा संपूर्ण भाग व्यापण्यास असमर्थ असतो तेव्हा असे वलयाकर सूर्यग्रहण होते. अशा परिस्थितीत सूर्याचा काही भाग चंद्राच्या मागून चमकतो आणि त्यांचे दृश्य आगीत जळत असलेल्या अंगठीसारखे दिसते. यालाच ‘रिंग ऑफ फायर’ असे म्हणतात. या सूर्यग्रहणाचे अद्भुत दृश्य संपूर्ण भारतात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण फक्त लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील भागातच दिसेल.

  हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, हिंदी महासागर आणि अंटार्क्टिका या भागातूनच पाहता येऊ शकते. देशा-विदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी लोक थेट वेबकॅमेराद्वारे हे सूर्यग्रहण पाहू शकतो. नासा या सूर्यग्रहणाचे लाईव्ह स्ट्रिमिंग करणार आहे. gov/live वर तुम्ही हे सूर्यग्रहणाचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकता किंवा ल्युक बोलार्डच्या सौजन्य रॉयल एस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ कॅनडा सडबरी सेंटरवरच्या यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता.

  हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे याची माहिती देखील नासाने दिली. पूर्वी लोकांनी दोनच चंद्रग्रहण पहिले होते. आणि आता वर्षाचे पहिले सूर्यग्रहण आज दिसणार आहे. यानंतर वर्षाचे दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण डिसेंबर महिन्यात दिसणार आहे.