iPhone SE 3 असू शकतो Apple चा सर्वात स्वस्त 5G फोन, जाणून घ्या

अ‍ॅप्पल कंपनी 'एसई' सीरीजच्या आगामी मॉडेल आयफोन एसई3 मध्ये ए14 बॉयोनिक चिपसेट देऊ शकते. हा चिपसेट गेल्यावर्षीच्या आयफोन 12 सीरीजमध्ये देण्यात आला होता. Apple A14 Bionic चिपसेट कंपनीचा पहिला 5जी फोन प्रोसेसर आहे.

    गेल्यावर्षी लाँच झालेल्या आयफोन 12 सीरीजमध्ये कंपनीने iPhone 12, iPhone 12 mini, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max लाँच केले होते. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि आगामी iPhone 13 सीरीजमध्ये देखील 5G कनेक्टिव्हिटी देण्यात येईल. परंतु त्यापेक्षा जास्त चर्चा iPhone SE 3 मध्ये मिळणाऱ्या 5G कनेक्टिव्हिटीची आहे.

    अ‍ॅप्पल कंपनी ‘एसई’ सीरीजच्या आगामी मॉडेल आयफोन एसई3 मध्ये ए14 बॉयोनिक चिपसेट देऊ शकते. हा चिपसेट गेल्यावर्षीच्या आयफोन 12 सीरीजमध्ये देण्यात आला होता. Apple A14 Bionic चिपसेट कंपनीचा पहिला 5जी फोन प्रोसेसर आहे.

    जर आगामी iPhone SE 3 मध्ये आयफोन 12 मधील चिपसेट देण्यात आला तर हा फोन कंपनीचा सर्वात स्वस्त 5G आयफोन ठरू शकतो.