स्क्रिन शॉटवरील संदेश होणार ट्रान्सलेट

गुगल लेन्समध्ये नवे अपडेट आले आहेत. स्क्रीन शॉटवर तुम्ही जे लिहाल ते ट्रान्सलेट होईल. गुगल वारंवार आपल्या प्लॅटफॉर्मला आधुनिक आणि उपयोग बनवत आहे.

    गुगल एक नवीच गंमत घेऊन येत आहे. तुम्ही फक्त स्क्रिनवर लिहायचे. त्यानंतर ते ऑटोमॅटिक ट्रान्सलेट होईल. एका इंग्रजी वेबसाईटने ही माहिती दिली. ते म्हणतात, गुगल लेन्समध्ये नवे अपडेट आले आहेत. स्क्रीन शॉटवर तुम्ही जे लिहाल ते ट्रान्सलेट होईल. गुगल वारंवार आपल्या प्लॅटफॉर्मला आधुनिक आणि उपयोग बनवत आहे. स्क्रीनशॉटवर टेक्स्ट ट्रान्सलेशनशिवाय स्क्रिन शॉट्सवर लिहिलेल्या टेक्स्टला कॉपीही केले जाऊ शकते. ज्याला आपण ऑफलाईनही वापरू शकता.

    सोबतच या टेक्स्टला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि शेअर करू शकता. हे फीचर अँड्रॉईड 11या वरील रेंजच्या फोनमध्ये चालेल. त्याखालील फोनमध्ये चालेल की नाही हे आताच सांगता येणार नाही. अँड्रॉईड 12 या वर्षी लाँच केला जाणार आहे. गुगल लेन्सला पहिल्यांदा 2017मध्ये गुगल आयओमध्ये समाविष्ट केले होते. हा एक रिकॉग्नायझेशन टूल आहे. जे पहिले गुगल असिस्टेंटसोबत आले होते. पूर्वी हा टुल गुगल पिक्सल 2 आणि गुगल पिक्सल 2 एक्स एलमध्ये काम करीत होते. एक वर्षानंतर 2018मध्ये याला गुगल फोटोज आणि अन्य अँड्रॉईड डिवाइसला सपोर्ट करायला लागले.