आता तुमच्या श्वासावरुन कळणार तुमचा कोरोना रिपोर्ट

सर्व देशांचे शास्त्रज्ञ कोरोनाबाबत संशोधनात गुंतले आहेत. दररोज काही न काही नवीन गोष्टींचा शोध लावला जात आहे जेणेकरुन लोकांना चांगले उपचार सापडतील. आता एका कंपनीने याबद्दल एक श्वास विश्लेषक (ब्रेथ एनालाइजर) बनविला आहे. जो एखाद्या व्यक्तीचा श्वास तपासल्यानंतरच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे सांगेल.

  डच कंपनी ब्रेथोमेक्सने बनवलेल्या स्पिरोनोजची श्वास-आधारित कोरोना चाचणी आहे. मे महिन्यात सिंगापूरच्या आरोग्य एजन्सीने ब्रेथोमेक्स आणि सिल्व्हर फॅक्टरी टेक्नॉलॉजीने केलेल्या दोन श्वास-आधारित चाचण्यांना अधिकृत मान्यता दिली आहे.

  ओहियो स्टेट विद्यापीठाच्या संशोधकांचे म्हणणे आहे की त्यांनी त्यांच्या कोविड श्वास विश्लेषकांच्या आपत्कालीन अधिकृततेसाठी अमेरिकेच्या अन्न व आमलीपदार्थ प्रशासन विभागाला अर्ज केला आहे.

  इंग्लंडमधील लॉफबरो विद्यापीठाचे रसायन शास्त्रज्ञ पॉल थॉमस म्हणतात की, “आता तुमच्या श्वासोच्छवासातुनही तुमची कोविड चाचणी करणे शक्य झालं आहे. आणि हे काल्पनीक नाही तर सत्य आहे.”

  शास्त्रज्ञ अनेक दिवसांपासून पोर्टेबल डिव्हाइस शोधत होते जे एखाद्या व्यक्तीच्या श्वासोच्छवासाद्वारे रोग ओळखू शकते. त्याच वेळी, या चाचण्या वेदनारहित असणे अवशक होते. परंतु आता हे स्वप्न पूर्ण झाले आहे.

  तुमचा आहार देखील श्वासोच्छवासाच्या बदलांवर परिणाम करू शकतो. या तंत्रज्ञानात धूम्रपान आणि मद्यपान करणार्‍या लोकांच्या श्वसनच्या चाचण्या करणे कठीण आहे.

  दरम्यान, संशोधकांनी या डिव्हाइसबद्दल असेही म्हटले आहे की ही मशीन केवळ एक पर्याय आहे. कोरोनाच्या इतर चाचणी पद्धती पूर्णपणे बदलली जाऊ शकत नाहीत.