BIPच्या ग्रुप कॉल्समध्ये सहभागी होऊ शकणाऱ्या सदस्यांची संख्या आता १५ पर्यंत

जगभरातून ८२ दशलक्षांहून अधिक डाऊनलोड्ससह कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म BIPने वापरकर्त्यांच्या गरजा व मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण नवोन्मेषांमध्ये आणखी एका सुविधेची भर केली आहे. BIPमार्फत केल्या जाणाऱ्या एचडी दर्जाच्या व्हॉइस व ग्रुप व्हिडिओ कॉल्समध्ये सहभागी होऊ शकणाऱ्या सदस्यांची कमाल मर्यादा आता १५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे एकमेकांपासून खूप दूर राहणारे लोक BIPच्या माध्यमातून जवळ येऊ शकतील.

  मुंबई : टर्किश इंजिनिअर्सनी विकसित केलेल्या तसेच टर्कीतील उच्च सुरक्षितता देणाऱ्या डेटा सेंटर्सद्वारे ज्याच्या डेटाचे संरक्षण केले जाते अशा बीआयपीने अन्य स्पर्धकांच्या तुलनेत वेगळ्या व श्रेष्ठ सुविधा देऊन कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म्समधील आघाडीचे स्थान कायम ठेवले आहे. बीआयपीवरील एचडी दर्जाच्या ऑडिओ व ग्रुप व्हिडिओ कॉल्समध्ये सहभागी होऊ शकणाऱ्या कमाल सदस्यांची संख्या १० वरून आता १५ करण्यात आली आहे. बीआयपी प्लॅटफॉर्म जगभरात ८२ दशलक्ष वेळा डाऊनलोड करण्यात आलेला प्लॅटफॉर्म आहे. आता बीआयपी कॉल्समधील सदस्यांची कमाल मर्यादा अन्य स्पर्धक प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. त्यामुळेच बीआयपी व्यवसाय तसेच विरंगुळ्याच्या भेटींसाठी सर्वांच्या पसंतीचा प्लॅटफॉर्म म्हणून कायम राहणार आहे. एकमेकांपासून दूर राहणाऱ्या मोठ्या कुटुंबांसाठीही हा संवादाचा सर्वोत्तम पर्याय आहे.

  जगभरातील १९२ देशांमधील लक्षावधी यूजर्ससह बीआयपी ही जागतिक कंपनी झाली आहे हे सांगत, बीआयपी कम्युनिकेशन्स टेक्नोलॉजिज आणि डिजिटल सर्व्हिसेसचे महा-संचालक बुराक अकिंकी म्हणाले: “आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म्सपैकी एक झालो आहोत आणि याचे श्रेय आमची ग्रुप व्हिडिओ कॉलिंग्ज, व्हॉइस व वेब इंटरफेसवरून होणारे व्हिडिओ कॉलिंग, संदेशवहन, १०६ भाषांत त्वरित भाषांतर करण्याची सुविधा तसेच पैसे पाठवण्याच्या सुविधांना जाते. प्रतिस्पर्धी उपयोजनांच्या बरेच आधी आम्ही या सुविधा अमलात आणल्या. तसेच व्यक्तिगत डेटा संरक्षणाविषयीच्या आमच्या पारदर्शक धोरणांनाही या यशाचे श्रेय जाते. आम्ही आणखी एक नवोन्मेषकारी सुविधा प्रत्यक्षात आणली आहे आणि ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये सहभागी होऊ शकणाऱ्या सदस्यांची कमाल संख्या १५ केली आहे. आगामी काळात आम्ही आमचे उपयोजन नवीन सुविधांनी सुसज्ज करत राहू. आमच्या वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया तसेच मागण्या लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले नवीन फीचर्स नक्कीच उपयुक्त ठरतील.”

  दुसऱ्या ॲप्लिकेशन्सवरून स्विच करणे खूपच सोपे

  अन्य मेसेजिंग ॲप्सवरून बीआयपीकडे स्विच करणे खूपच सोपे आहे. बीआयपीचे “ग्रुप मुव्हिंग” फीचर हे जगभरात कोणीही वापरू शकते, मग ऑपरेटर कोणताही असूदे. त्यामुळे वापरकर्ते बीआयपीपूर्वी वापरत असलेल्या मेसेजिंग ॲप्सवरील समूह आणि चॅट हिस्टरी झटपट व सहजपणे बीआयपीवर आणू शकतात. याशिवाय वापरकर्त्याने त्याचे पूर्वीचे समूह (ग्रुप्स) बीआयपीवर हस्तांतरित केले असता, बीआयपी इन्स्टॉल केलेले ग्रुपमधील सदस्य स्वयंचलितरित्या या ग्रुप्समध्ये ॲड होतात. यासाठी प्रत्येक सदस्य निवडण्याची गरज भासत नाही. ही सुविधा अन्य कोणत्याही मेसेजिंग ॲपमध्ये नाही.

  १५ सदस्यांसह एचडी दर्जाचे व्हॉइस व व्हिडिओ कॉल बीआयपीवरून करण्यासाठी तुम्ही वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

  The number of members who can participate in BIP group calls is now up to 15