Hayabusa-2 jelenti

हायाबुसा-२ यान सहा वर्षानंतर पृथ्वीवर परत येणार आहे. लघुग्रहावरील माती, दगडाचे नमुने घेवून यान परत येणार असल्याने यामुळे ग्रहांच्या उत्पत्तीचे गूढ उकलण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

दिल्ली. ग्रहांच्या उत्पत्तीची माहिती मिळावी यासाठी जगभरातील अंतराळ संस्था संशोधन करीत आहे. जपानच्या अंतराळ संस्थेने २०१४ मध्ये हायाबुसा-२ यान (spacecraft ) पृथ्वी, चंद्र व सूर्याच्या समांतर उंचीवर असणाऱ्या लघुग्रहावर पाठविले होते. शास्त्रज्ञांनी ज्या उद्दिष्टाने हे यान लघुग्रहावर पाठविले होते ते पूर्ण केले असून रविवारी (६ डिसेंबर) हायाबुसा-२ यान सहा वर्षानंतर पृथ्वीवर परत (arrive on Earth ) येणार आहे. लघुग्रहावरील माती, दगडाचे नमुने घेवून यान परत येणार असल्याने यामुळे ग्रहांच्या उत्पत्तीचे गूढ उकलण्यासाठी (unraveling the mystery ) मोठी मदत होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

असे आहे संशोधनाचे उद्दिष्टे

– जपानी अंतराळ यान लघुग्रहाचे नमुने सोडेल

– २०१४ मध्ये लाँच केले हायाबुसा २ यान

– ३० कोटी किलोमीटर अंतरावर नमुने गोळा करण्यासाठी उतरले

– २,२०,००० किमी उंचीपासून वेगळे होणार कॅप्सूल

– २ नवीन लघुग्रह असणार यानाचे पुढील लक्ष्य

– ६ वर्षापर्यंत यान सूर्याभोवती फिरणार

दहा वर्षापर्यंत अंतराळात राबविणार शोधमोहीम

जपानच्या संशोधकांनी चंद्र, मंगळ, उपग्रह व ताऱ्यांवर संशोधन करण्याऐवजी लघुग्रहाच्या संशोधनाला प्राधान्य दिले. रेगुया लघुग्रहांचे नमुने यानाने गोळा केले असून रविवारी यान पृथ्वीवर पोहोचेल. विशेष असे की, हायाबुसा २ यान लघुग्रहाचे नमुने पृथ्वीवर सोडल्यानंतर परत अंतराळात जाणार आहे. नमुने गोळा करण्यासाठी पृथ्वीपासून ३० कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या लघुग्रहांवर यान पाठविण्यात आले होते. त्यावेळी शास्त्रज्ञांमध्ये मोठा उत्साह होता. नमुने पृथ्वीवर पाठविल्यावर अंतराळात पुन्हा परत जाणारे हायाबुसा २ यान तब्बल दहा वर्षापर्यंत अंतराळात राहून शोधमोहीम राबविणार आहे. इतकेच नव्हे तर त्याचे लक्ष्य या वेळी २ नवीन लघुग्रहावर संशोधन करण्याचे उद्दिष्टये आहेत.

सौर मंडळाच्या निर्मितीची माहिती मिळणार

– शास्त्रज्ञांना आशा आहे की यानाच्या कॅप्सूलमध्ये असलेल्या ०.१ ग्रॅम पदार्थावरील संशोधनानंतर सौर मंडळाच्या उत्पत्तीबद्दल माहिती मिळले. सौर मंडळाची उत्पत्ती ६.६ अब्ज वर्षांपूर्वी झाली होती.

– लघुग्रहाचा पृथ्वीशी काय संबंध आहे याबद्दल माहिती मिळण्याची शक्यता आहे. सूर्यप्रकाश आणि किरणोत्सर्गापासून संरक्षित हे नमुने जपानमध्ये जमा केले जातील. यापैकी निम्मे नमुने जॅक्सा, नासा आणि अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांना वितरित केले जाईल.

– नमुने पृथ्वीवर सोडल्यानंतर हायाबुसा २ सूर्याच्या सभोवताल ६ वर्षापर्यंत फिरत राहील. दरम्यान ग्रहांच्या धुळीचा डेटा गोळा करेल. यानंतर, जुलै २०२६ मध्ये, ते लघुग्रहांकडे कूच करेल. तर २०३१ मध्ये केवळ ३० मीटर मोठ्या १९९८ केवाय २६ लघुग्रहाकडे जाईल.

– या अभियानाचे व्यवस्थापक मोकोटो योशिकावा म्हणाले की शास्त्रज्ञांना असे पदार्थ सापडू शकतात जे ग्रहांच्या उत्पत्तीपासून जीवनाच्या उत्पत्तीपर्यंत माहिती देऊ शकतात.