WhatsApp चे हे 5 येणारे नवीन फीचर्स करणार तुमचा अनुभव समृद्ध, जाणून घ्या काय आहे खास

हे फीचर आल्यानंतर काही वेळासाठी ॲप लॉगआऊटही करता येणार आहे. WaBetaInfo च्या एका रिपोर्टनुसार, WhatsApp नवीन बीटी व्हर्जन मध्ये लॉगआऊच्या ऑप्शन वरही काम करत आहे, यामुळे अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लेटफॉर्मसाठी उपलब्ध होणार आहे.

  युजर्सला आता आपले WhatsApp अकाऊंट अनेक डिव्हाइसेसमध्ये ओपन करणयाची संधी मिळणार आहे. हे एक मल्टी-डिव्हाइस सपोर्ट फीचर आहे, यावर कंपनी अद्यापही काम करत आहे. या फीचरची युजर्सला खूपच आश्यकता आहे. हे फीचर आल्यानंतर युजर्सला आपले अकाऊंट अनेक डिव्हाइसेसमध्ये ॲक्सेस करण्याची सुविधा मिळणार आहे.

  WhatsApp करता येणार लॉगआउट

  WhatsApp ही जेव्हा हवं तेव्हा लॉगआउट करता येणार आहे. या फीचरमुळे युजर्सला खूपच मदत मिळणार आहे , कारण सतत मेसेज येत असल्या कारणाने अनेकजण हैराण होतात. तर अशातच हे फीचर आल्यानंतर काही वेळासाठी ॲप लॉगआऊटही करता येणार आहे. WaBetaInfo च्या एका रिपोर्टनुसार, WhatsApp नवीन बीटी व्हर्जन मध्ये लॉगआऊच्या ऑप्शन वरही काम करत आहे, यामुळे अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लेटफॉर्मसाठी उपलब्ध होणार आहे.

  Read Later फीचर

  Whatsapp Read Later फीचर ही सादर करू शकते. हे फीचरही लवकरच उपलब्ध होईल अशी आशा आहे. Read Later फीचरचा वापर आपल्याला कोणाच्याही Chat ला इग्नोर करण्यासाठी करू शकतो.

  WhatsApp वेबवरून कॉल

  WhatsApp आजवर फक्त ऑडियो आणि व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा देत होते। अशातच WhatsApp वेबवरून कॉल करण्याच्या सुविधेचीही मागणी करण्यात आली आहे, यानंतर ही सुविधा लवकरच सादर करण्यात येईल असा तर्क लावण्यात येत आहे. टेलीग्राम मध्ये हे फीचर आधीपासूनच उपलब्ध आहे.

  ग्रुप चॅट्स येऊ शकते मेंशन बॅज

  WhatsApp ग्रुप चॅट्ससाठी मेंशन बॅज फीचर आणण्याची तयारी करत आहे. अँड्रॉइड च्या WhatsApp बीटा ॲप मध्ये ‘मेंशन बॅज’ दिलं आहे, जे ग्रुप चॅट्स मध्ये दिसणार आहे. आपण ग्रुपमध्ये सल्लामसलत केल्याने हे समूह सेलमध्ये एक नवीन बॅज जोडेल.