११७ वर्षांपासून प्रकाश देत आहे हा बल्ब; जगभरात आहे कुतूहलाचा विषय

थॉमस अल्वा एडिसनने विजेच्या बल्बचा शोध लावल्यानंतर आजपर्यंत बल्बमध्ये अनेक बदल झालेले आहेत. आता तर एलईडी लाईटस्चा जमाना आला आहे. मात्र, जुन्या काळातील टंगस्टनचा बल्ब असो किंवा सध्याचा एलईडी, त्यांचे आयुष्य ठराविकच असते. अशा काळात गेल्या १७७ वर्षांपासून प्रकाशित होत असलेला बल्ब लोकांच्या कुतूहलाचा विषय बनला आहे.

थॉमस अल्वा एडिसनने विजेच्या बल्बचा शोध लावल्यानंतर आजपर्यंत बल्बमध्ये अनेक बदल झालेले आहेत. आता तर एलईडी लाईटस्चा जमाना आला आहे. मात्र, जुन्या काळातील टंगस्टनचा बल्ब असो किंवा सध्याचा एलईडी, त्यांचे आयुष्य ठराविकच असते. अशा काळात गेल्या १७७ वर्षांपासून प्रकाशित होत असलेला बल्ब लोकांच्या कुतूहलाचा विषय बनला आहे. हा बल्ब १९०१ मध्ये सुरू करण्यात आला होता.

 

कॅलिफोर्नियातील लिव्हरमोर येथे हा बल्ब आहे. तेथील अग्निशमन दलाच्या केंद्रात हा बल्ब १९०१ मध्ये लावण्यात आला जो आजपर्यंत आपले काम चोखपणे बजावत आहे. ४ वॅट विजेवर हा बल्ब चोवीस तास प्रकाश देतो. केवळ १९३७ मध्ये तेथील लाईन खराब झाल्यानंतर त्या बदलण्याच्या काळापुरता हा बल्ब बंद राहिला. नवीन तारा जोडल्यावर हा बल्ब पुन्हा प्रकाशित झाला. त्या वेळेपासून तो सतत प्रकाशितच आहे. २००१ मध्ये या बल्बने आपला शंभरावा वाढदिवसही साजरा केला.

त्यावेळी संगीत कार्यक्रम आणि मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. हा बल्ब पाहण्यासाठी दूरवरून लोक येत असतात. तो आता एकच वस्तू असलेले ‘म्युझियम’च बनला आहे! या बल्बची गिनिज बुकमध्येही नोंद करण्यात आली आहे.