Koo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये?

Koo वर एक प्रतिष्ठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यलो (पिवळी) टिक मिळवू इच्छिणाऱ्या सर्वांचे कू (Koo) स्वागत करत आहे. अंतर्गत परीक्षण, बाह्य संस्थांकडील माहिती आणि भारतीय समाजातील स्थान यांच्या आधारे लौकिकाचे मूल्यमापन केले जाईल. कू (Koo) च्या विशेष टीमद्वारे दरवर्षी मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर या महिन्यात प्रतिष्ठेच्या मापदंडांचे पुनरावलोकन केले जाईल.

  Koo कू वरील यलो (पिवळी) टिक हिंदुस्थानी युजर्सचे सामाजिक तसेच व्यावसायिक स्थान, प्रतिष्ठा, नैतिकता, यश, क्षमता ओळखून त्यांना सन्मानित करते. याचा अर्थ असा होतो की युजर हा कलाकार, विद्वान, क्रीडापटू, राजकारणी, व्यापारी किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील एक सन्मानित व्यक्ती आहे.

  Koo वर एक प्रतिष्ठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यलो (पिवळी) टिक मिळवू इच्छिणाऱ्या सर्वांचे कू (Koo) स्वागत करत आहे. अंतर्गत परीक्षण, बाह्य संस्थांकडील माहिती आणि भारतीय समाजातील स्थान यांच्या आधारे लौकिकाचे मूल्यमापन केले जाईल. कू (Koo) च्या विशेष टीमद्वारे दरवर्षी मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर या महिन्यात प्रतिष्ठेच्या मापदंडांचे पुनरावलोकन केले जाईल.

  आज पर्यंत प्रतिष्ठेच्या या ‘यलो टिक’ साठी आलेल्या विनंती अर्जांतून एक टक्का लोकांना त्यांच्या भाषेतील लोकप्रियते नुसार ‘यलो टिक’ प्रदान करण्यात आली आहे. हे कठोर नियम यलो टिकचे महत्त्व आणि जबाबदारी सुनिश्चित करतात.

  लौकिकतेच्या निकषांवर प्रकाश टाकत, कू (Koo) चे सह-संस्थापक आणि सीईओ, अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले, “कू वरील प्रतिष्ठेची यलो टिक ही एक ओळख आहे की संबंधित युजर हा हिंदुस्थानी आणि हिंदुस्थानींच्या आवाजाचा महत्त्वपूर्ण प्रतिनिधी आहे. आम्ही देशातील स्थानिक वास्तवाची नोंद ठेवूनही प्रक्रिया तयार केली आहे आणि ऑनलाइन संवाद साधताना जबाबदारपणे वागणाऱ्याच युजर्सचा आदर राखण्यासाठी पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

  कू (Koo) ॲपचे सह-संस्थापक मयंक बिदावाटका पुढे सांगतात “आम्हाला अभिमान आहे की सार्वजनिक क्षेत्रात प्रसिद्धीमिळविण्यासाठी कू ने आपले निकष लावले आहेत. देशाच्या संदर्भात प्रतिष्ठेचे मूल्यांकन केले जात असल्याने ते भारतीयांना यलो टिक मिळवण्याची अधिक चांगली मदत होते. डिजिटल संभाषणांना आंतरजातीय आणि विधायक बनवण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ”

  व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  • डाऊनलोड करण्या करिता: यूजर्स मोबाईल ॲपस्टोअरमधून कू ॲप डाउनलोड करू शकतात.
  • मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीच्या मदतीने यूजर्स रजिस्टर करू शकतात.
  • त्यानंतर कू वर ते त्यांचे आवडते सेलिब्रेटी, खेळाडू, राजकीयनेते, कलाकार, विचारवंत यांना फॉलो करू शकतात.
  • कू त्यांना त्यांच्या मातृभाषेतून त्यांचे विचार, दृष्टिकोन तसेच कल्पना मांडण्यास सक्षम करत आहे.