JioPhone ला टक्कर देण्यासाठी देशी कंपनीचा भन्नाट फोन भारतीय बाजारात लॉन्च, जाणून घ्या काय आहेत फिचर्स ?

या फोनमध्ये अनेक भारतीय भाषांना सपोर्ट देण्यात आला आहे. डिवाइसमध्ये 2000 कॉन्टॅक्टस साठवून ठेवता येतात. तसेच, यातील 1900mAh ची बॅटरी 24 दिवसांचा स्टॅन्डबाय टाइम देते. फोन 2जी, 3जी, 4जी, वाय-फाय आणि ब्लूटूथला देखील सपोर्ट करतो.

    देशी कंपनी itel ने किफायतशीर फोन लाँच करण्यासाठी ओळखली जाते. आता कंपनीने आपला पहिला 4G ड्युअल सिम फीचर फोन ‘Magic 2 4G’ भारतीय बाजारात सादर केला आहे. या फोनची थेट टक्कर Jio Phone आणि Jio Phone 2 शी होईल. मॅजिक 2 4जी मध्ये 2.4 इंचाचा QVGA 3D कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे.

    तसेच, फोनमध्ये फक्त 128MB इंटरनल स्टोरेज आहे. परंतु, तुम्ही 64GB पर्यंतच्या माइक्रोएसडी कार्डचा वापर करू शकता. त्याचबरोबर या फोनमध्ये किंग वॉयस आणि टेक्स्ट टू स्पीच फीचर देण्यात आले आहेत.