बंद दाराआड ‘या’ गोष्टी करणं गुन्हा आहे का? कायदा काय म्हणतो? जाणून घ्या

जर कोणतीही व्यक्ती बंद दाराआड लॅपटॉप किंवा मोबाईलवर पॉर्न चित्रपट पाहत असेल. तर हा गुन्हा नाही. देशाच्या सर्वोच्च न्यायालायाने २०१५ मध्ये म्हटले होते की, वयस्क व्यक्ती बंद दाराआड पॉर्न फिल्म पाहत असेल तर, तो त्याचा खासगी अधिकार आहे.

  नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा सध्या पॉर्न व्हिडिओ स्कँडलबाबत कायदेशीर कारवाईचा सामना करत आहे. देशात पॉर्न चित्रपटांच्या बाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. परंतु प्रश्न हा आहे की, भारतात पॉर्न चित्रपट पाहणे बेकायदेशीर आहे का?

  बंद दाराआड पॉर्न चित्रपट पाहणे

  जर कोणतीही व्यक्ती बंद दाराआड लॅपटॉप किंवा मोबाईलवर पॉर्न चित्रपट पाहत असेल. तर हा गुन्हा नाही. देशाच्या सर्वोच्च न्यायालायाने २०१५ मध्ये म्हटले होते की, वयस्क व्यक्ती बंद दाराआड पॉर्न फिल्म पाहत असेल तर, तो त्याचा खासगी अधिकार आहे.

  परंतु भारतात चाइल्ड पॉर्नोग्राफी पाहणं बेकायदेशीर आहे. तसेच तुम्ही अश्लिल चित्रपट शेअर करीत आहात किंवा प्रकाशित करत आहात तुम्ही मोठा गुन्हा करीत आहात.

  वेबसाईटवरून मोबाईलमध्ये सेव करणे आणि शेअर करणे गुन्हा

  भारतात पॉर्न वेबसाईट्सला बंदी आहे. सरकारच्या अनेक प्रयत्नानंतरही अनेक वेबसाईट एडल्ट कंटेंट दाखवत आहेत. परंतु भारतात या साईट्सला बंदी असल्याने त्यावरील कंटेंट आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये सेव करणे गुन्हा आहे. याशिवाय भारतात पॉर्न बनवणे आणि विकणे गुन्हा आहे. हा गुन्हा आयपीसी २९२ अंतर्गत येतो.

  to watch download and share porn privately is it a crime what does the law say read in details