Google Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी

Google ने Doodleच्या माध्यमातून टोक्यो ऑलिम्पिकचे एका खास अंदाजात स्वागत केले आहे. यात युजर्सला ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधीही मिळणार आहे.

  २३ जुलैपासून टोक्यो ऑलिम्पिक २०२१ ची सुरुवात झाली आहे. आणि या इव्हेंट हेरून यावेळीही Google ने Doodle तयार करून याचे वेगळ्या अंदाजात स्वागत केले आहे. Google विशेष दिवसाचे औचित्या साधून Doodle च्या माध्यमातून त्याचे सेलिब्रेशन करतो. अशातच टोक्यो ऑलिम्पिक २०२१ वर आधारित तयार केलेले Google Doodle ही खूपच अद्वितीय असे आहे. यात युजर्सला ॲनिमेटेड खेळण्याची संधी मिळेल आणि आपण यात सहभागी होऊन त्याचा आनंद घेऊ शकता.

  Google Doodle मध्ये ॲनिमेटेड डूडल चॅम्पियन आयलंड गेम्स लाँच करण्यात आला आहे, यात सात मिनी गेम्स सोबतच दिग्गज प्रतिस्पर्धी आणि बर्‍याच स्पर्धा अ‍ॅनिमेटेड पद्धतीने सादर करण्यात आल्या आहेत. जे पाहायला अतिशय आकर्षक दिसत आहे. एवढंच नाही तर यात आपल्याला गेम्स खेळण्याची संधीही मिळणार आहे.

  जसे की, आपण Google ओपन केल्यानंतर आपल्याला ॲनिमेटेड Google Doodle दिसेल. ज्यात सात मिनी गेम्स देण्यात आले आहेत आणि प्ले बटणही दिलं आहे. प्ले बटणावर क्लिक करताच तुम्ही चॅम्पियन आयलंडमध्ये प्रवेश कराल. या ठिकाणी आपल्याला ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी मिळेल. Google ने याला डूडल चॅम्पियन आयलंड असं नाव दिलं आहे. यात समाविष्ट असलेले गेम्स अतिशय मजेशीर आहेत आणि ते खेळताना आपल्याला खूप मजाही येईल.

  Google Doodle वर आपण रियल टाइम लीडरबोर्ड सोबत नींजा कॅट गेम खेळू शकता. येथे आपल्याला ब्लू, रेड, यलो आणि ग्रीन चार टीम्ससोबत खेळण्याची संधी मिळेल. Google Doodle मध्ये दिलेल्या सात मिनी गेम्समध्ये टेबल टेनिस, स्केटबोर्डिंग, तिरंदाजी, रग्बी, स्विमिंग, गिर्यारोहण आणि मॅरेथॉनचा समावेश आहे.

  आम्ही आपणाला सांगू इच्छितो की, ॲनिमेटेड गेम्स खेळण्यासाठी आपल्याला काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत याच्या मदतीने तुम्ही गेम्समध्ये आगेकूच करू शकाल. गेम्सच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत खेळणाऱ्या प्लेयर्सना आकर्षक ट्रीटही देण्यात येईल. ट्रीट म्हणून भाग्यशाली विजेत्यांच्या चेहऱ्यावर फुले आणि तीन रंगांच्या पेस्ट्रीजचा वर्षाव होईल. हे खूपच विशेष असणार आहे आणि आपल्याला शेवटपर्यंत खेळण्यातही अतिशय मजा येईल. हे गेम्स खेळताना तुमचा वेळ कसा निघून गेला याचा तुम्हाला थांगपत्ताही लागणार नाही.

  google doodle celebrate tokyo olympic 2021 with animated games see full story in details