आधार कार्डाच्या धर्तीवर नागरिकांना मिळणार युनिक हेल्थ कार्ड, वाचा सविस्तर मोदी सरकारचा नवा प्लॅन

Unique Health Card : हे कार्ड पूर्णपणे डिजिटल (Digital) असेल जे दिसायला आधार कार्डसारखे (Aadhaar Card) असेल. या कार्डवर तुम्हाला नंबर मिळेल, तुम्हाला आधार क्रमांकाप्रमाणे एक नंबर देण्यात येईल. आरोग्य सुविधा आणि योजनांचा (Health Facilities And Schemes) लाभ घेताना या क्रमांकाद्वारे संबंधित व्यक्तीची ओळख (Identity) पटवली जाईल.

  नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांमध्ये आधार कार्डाच्या (Aadhaar Card) वापरामुळे शेतकरी आणि गरीब नागरिकांना (Farmers And Poor Peoples) सरकारी अनुदान किंवा संकट काळात आर्थिक मदत थेट बँक खात्यात देणे शक्य झाले (It was possible to give government grants or financial aid directly to the bank account in times of crisis). आधार कार्डामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये (Financial Transations) अधिक पारदर्शकता आली आहे.

  सामान्य नागरिकांसाठी (Common Peoples) आधार कार्डामुळे अनेक फायदे झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मोदी सरकार (Modi Government) भारतीय नागरिकांसाठी (Citizens Of India) युनिक हेल्थ कार्ड (Unique Health Card) आणण्याच्या विचारात आहे. केंद्रीय स्तरावर सध्या तशा हालचाली सुरु आहेत.

  डिजिटल हेल्थ मिशन (Digital Health Mission) अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीचे एक युनिक आरोग्य कार्ड बनवणार आहे. हे कार्ड पूर्णपणे डिजिटल असेल जे दिसायला आधार कार्डसारखे असेल. या कार्डवर तुम्हाला नंबर मिळेल, तुम्हाला आधार क्रमांकाप्रमाणे एक नंबर दिला जाईल. आरोग्य सुविधा आणि योजनांचा लाभ घेताना या क्रमांकाद्वारे संबंधित व्यक्तीची ओळख पटवली जाईल.

  या क्रमांकाद्वारे डॉक्टरांना संबंधित व्यक्तीची वैद्यकीय पार्श्वभूमी एका क्लिकवर उपलब्ध होईल. तसेच व्यक्तीला कोठे उपचार मिळाले हे कळेल. त्या व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक माहिती या अनोख्या आरोग्य कार्डमध्ये नोंदवली जाईल. या कार्डचा फायदा असा होईल की रुग्णाला त्याच्यासोबत प्रचंड फाईल्स बाळगाव्या लागणार नाहीत.

  डॉक्टर किंवा हॉस्पिटल रुग्णाचा युनिक हेल्थ आयडी बघेल आणि त्याचा सर्व डेटा काढतील. त्या आधारावर पुढील उपचार सुरू केले जाऊ शकतात. व्यक्तीला कोणत्या सरकारी योजनांचा लाभ मिळतो हे देखील हे कार्ड सांगेल. आयुष्मान भारत अंतर्गत उपचाराच्या सुविधांचा लाभ रुग्णाला मिळतो की नाही, हे या अनोख्या कार्डाद्वारे कळेल.

  राष्ट्रीय आरोग्य योजना म्हणजे काय?

  ‘डिजिटल इंडिया’ (Digital India) योजनेअंतर्गत, केंद्र सरकारने (Central Govenment) राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान सुरू केले आहे. या मोहिमेचा उद्देश आरोग्य क्षेत्रातील लोकांना जागरूक करणे आणि त्यांना आरोग्य अभियानाशी जोडणे हा आहे. यासोबतच देशातील प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य सुविधा (Best Health Facilities) पुरवाव्या लागतील. सरकारला यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. युनिक हेल्थ कार्डची सुविधा पूर्णपणे ऑनलाईन (Online) असेल. या उपक्रमाला डिजिटल हेल्थ मिशन (Digital Health Mission) असे नाव देण्यात आले आहे.

  असा होणार युनिक हेल्थ कार्डचा फायदा

  युनिक हेल्थ आयडी अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीचा आरोग्याशी संबंधित डेटाबेस तयार करेल. या आयडीसह, त्या व्यक्तीची वैद्यकीय माहिती रेकॉर्ड केली जाईल. या आयडीच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण वैद्यकीय रेकॉर्ड पाहिले जाऊ शकते. जर ती व्यक्ती डॉक्टरकडे गेली तर तो त्याचा आरोग्य आयडी दाखवेल.

  या आयडीवरुन संबंधित रुग्णावर यापूर्वी कोणते उपचार केले गेले, कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घेतला गेला आणि कोणती औषधे आधी दिली गेली, असा सर्व तपशील उपलब्ध होईल. एखादी व्यक्ती कोणत्या वर्गात येते आणि त्याची आर्थिक स्थिती काय आहे याची माहिती सरकारला डेटाबेसमधून मिळेल. त्याच आधारावर सरकार अनुदानाचा लाभ इत्यादी देण्यास सक्षम असेल.

  हेल्थ कार्डमध्ये कोणत्या गोष्टींचा असणार अंतर्भाव?

  सर्वप्रथम, ज्या व्यक्तीचा आयडी तयार होईल त्याच्याकडून मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक घेतला जाईल. या दोन नोंदींच्या मदतीने एक युनिक आरोग्य कार्ड तयार केले जाईल. यासाठी, सरकार एक आरोग्य प्राधिकरण तयार करेल, जे वैयक्तिक डेटा गोळा करेल. ज्या व्यक्तीचे आरोग्य ओळखपत्र बनवायचे आहे त्याचे आरोग्य रेकॉर्ड गोळा करण्यासाठी आरोग्य प्राधिकरणाकडून परवानगी दिली जाईल. या आधारावर पुढील काम केले जाईल.

  सार्वजनिक रुग्णालय, सामुदायिक आरोग्य केंद्र, आरोग्य आणि निरोगी केंद्र किंवा राष्ट्रीय आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर रजिस्ट्रीशी संलग्न असलेले आरोग्य सेवा प्रदाता एखाद्या व्यक्तीचे आरोग्य आयडी तयार करू शकतात. तुम्ही https://healthid.ndhm.gov.in/register येथे तुमच्या स्वतःच्या नोंदी नोंदवून तुमचा हेल्थ आयडी तयार करू शकता.