‘बिग बिलियन डेज २०२१’ उपक्रमात MSME आणि KIRANA व्यवसायिकांना अभूतपूर्व संधी, तर ग्राहकांना अतुलनीय मूल्य

गतवर्षीपेक्षा यंदा Flipkart Plus च्या ग्राहकांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खासकरून ४५ टक्के ग्राहक मागणी ही 3 Tier दर्जाच्या शहरांमधून असून उच्च मूल्याच्या वस्तू खरेदीला त्यात प्राधान्य आहे. २ दशलक्षहून अधिक ग्राहकांनी फक्त १ रुपया देऊन अर्ली अक्सेस Early Acess उपक्रमामध्ये सुमारे ५ दशलक्ष उत्पादनांची पूर्व-नोंदणी Pre-registration केली आहे. त्यामुळे या महोत्सवाची अपेक्षा स्पष्टच होती.

  • उत्साही ग्राहक भावना आणि विक्रत्यांचा जोरदार सहभाग यामुळे यागामी वर्षात निरंतर खपाचे सकारात्मक संकेत मिळत आहेत
  • हिंगणा, बाघपत, अटिंगल, संभल आणि देवा यासारख्या १२४ शहरातील नवीन विक्रेत्यांना संधी
  • शेवटच्या टप्प्यापर्यंत वितरण भागीदार म्हणून १,००,००० पेक्षा जास्त किराणा व्यवसायिकांचा या उत्सवात सहभाग
  • मोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक्स, मोठी उपकरणे, लाईफस्टाईल, बीजीएम आणि घरगुती उपकरणे यांची मोठ्याप्रमाणात मागणी

बेंगळुरू : ‘द बिग बिलियन डेज’ Big Billion Days या Flipkart च्या प्रमुख वार्षिक महोत्सवाच्या आठव्या पर्वाची सकारात्मक सुरुवात झाली असून, त्यामध्ये देशातील ग्राहकांच्या उत्साही भावनांचा ट्रेंड आणि फ्लिपकार्टने सक्षम केलेला MSME आणि विक्रेत्यांचा विकास परावर्तित होत आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा Flipkart Plus च्या ग्राहकांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खासकरून ४५ टक्के ग्राहक मागणी ही 3 Tier दर्जाच्या शहरांमधून असून उच्च मूल्याच्या वस्तू खरेदीला त्यात प्राधान्य आहे. २ दशलक्षहून अधिक ग्राहकांनी फक्त १ रुपया देऊन अर्ली अक्सेस Early Acess उपक्रमामध्ये सुमारे ५ दशलक्ष उत्पादनांची पूर्व-नोंदणी Pre-registration केली आहे. त्यामुळे या महोत्सवाची अपेक्षा स्पष्टच होती.

भारतीयांच्या उत्साही भावना लक्षात घेऊन फ्लिपकार्टने यंदा ‘बीबीडी शगुन’ (एक खास बक्षीस योजना) यावर्षी राबविली व बक्षीस वितरणही केले. पहिल्या १२ तासांच्या अर्ली अक्सेसमध्ये सहभागी होत २,५०,००० पेक्षा जास्त ग्राहकांनी सुमारे २ कोटी रुपयांची पुनर्प्राप्ती या ऑफरमधून केली.तर बीबीडी स्पेशलला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून सुमारे १,००,००० ग्राहकांनी पहिल्या १२ तासांच्या अर्ली अक्सेसमध्ये उत्पादनांसाठी ऑर्डर्स नोंदवल्या आहेत.

यासंदर्भात बोलताना, फ्लिपकार्टच्या ग्राहक आणि वृद्धी विभागाच्या उपाध्यक्षा नंदिता सिन्हा यांनी सांगितले कि, “यावर्षीच्या ‘टीबीबीडी’मध्ये ग्राहक आणि विक्रत्यांचा अत्यंत उत्साही सहभाग पाहण्यास मिळाला. लोकांकडून आता ई-कॉमर्सला मोठ्याप्रमाणात स्वीकारले जात असून वापरकर्ता-अनुकूल तांत्रिक आणि आर्थिक सुविधांमुळे ई – कॉमर्सचा अवलंब करण्यास मदत होत आहे, हे स्पष्ट झाले आहे. या वर्षात शक्य तितक्या चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न कायम आहे, त्यातून सर्वोत्तम मूल्य देणारी उत्पादने आम्ही उपलब्ध करत आहोत. तसेच आमचे हे व्यासपीठ ग्राहकांसाठी अधिकाधिक सुलभ आणि परवडणारे व्हावे यासाठी नवनवीन सुविधा पुरवीत आहोत. आमची ही सुविधा विक्रेते आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांपर्यंत विस्तारणार आणि अधिक सक्षम करणार आहोत, त्यामुळे कोट्यवधी लोकांना चांगली मिळकत आणि राहणीमान मिळेल तसेच आमची पोहोच देशभरात निर्माण होईल. हे वर्ष सर्वांसाठी समृद्धी आणि कल्याणकारी ठरेल अशी आमची आशा आहे.”

या उत्सवात, पाचपैकी एका ग्राहकाने आपला जुना फोन बदलून नवीन स्मार्टफोन घेण्याचा पर्याय निवडला आहे. त्याकरिता आपल्या नव्या स्मार्टफोनसाठी ८२.६० टक्के ग्राहकांनी पैसे जमा करण्यासाठी प्रीपेड पेमेंट पर्याय निवडला. अँपल १२ आणि अँपल १२ मिनी हे सध्या सर्वाधिक आकर्षक स्मार्टफोन ठरले असून सुमारे दोन लाख अँपल १२ आयफोनची विक्री झाली आहे. त्याचप्रमाणे गृहपयोगी उपकरणांमध्ये टीव्हीची विक्री मोठ्याप्रमाणात झाली, तर इलेक्ट्रॉनिक्स प्रवर्गात लॅपटॉपची विक्रीही विक्रमी झाली आहे. वायरलेस इअरफोनची मागणीही प्रचंड वाढली आहे. शिवाय स्पोर्ट शुज, बाहेर वापरण्याचे पोशाख आणि पुरुषांच्या कपड्यांची जोरदार मागणी नोंदवली गेली. त्यातून गेल्या वर्षभरातील कोरोना बंधनातून मुक्त होऊन लोकांची बाहेर पडण्याची तयारी सुरु असल्याचे स्पष्ट होते.

फ्लिपकार्ट पे-लेटर, नो-कॉस्ट ईएमआय, फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आणि अन्य आर्थिक सुविधांमुळे उच्च किमतीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांना सहज सोय उपलब्ध झाली. टीबीबीडीच्या या पर्वात परवडणाऱ्या पेमेंट सुविधांचा ग्राहकांनी मोठा अवलंब केला आहे. प्रीपेड ऑर्डर्समध्ये क्रेडिट कार्डनंतर दुसऱ्या स्थानावर ‘फ्लिपकार्ट पे-लेटर’चा या सुविधेच्या वापराचा समावेश आहे. तसेच ही सवलत ग्राहकांनी धान्य, लाईफस्टाईल आणि गृहपयोगी वस्तू या प्रवर्गातील उत्पादनांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात वापरली आहे. युपीआय पेमेंट सुविधेला मागे टाकून ‘फ्लिपकार्ट पे-लेटर’चा सर्वाधिक वापर होत आहेच, शिवाय आता नव्याने सुरु केलेल्या “फ्लिपकार्ट पे-लेटर ईएमआय” सुविधेचा वापर सुरु झाल्यापासून दहा पटीने वाढला आहे.

पहिल्या २४ तासांमध्ये, हिंगणा (महाराष्ट्र), बाघपत (उत्तर प्रदेश), अटिंगल (केरळ), संभल (उत्तर प्रदेश) आणि देवा (उत्तर प्रदेश) यासारख्या नवीन १२४ शहरे आणि गावातील विक्रेत्यांनी व्यवहार केले आहेत. मोबाईल सुरक्षा, गृह सजावट, घरगुती उपकरणे आणि महिला वस्तू या प्रवर्गामध्ये बाजारपेठेतील विक्रेत्यांना मोठा फायदा झाला.

शेवटच्या टप्प्यापर्यंत वितरण उपक्रमामध्ये एक लाख पेक्षा जास्त किराणा व्यवासिकांनी सहभाग नोंदविला, त्यातून पुरवठा साखळीचा विस्तार देशाच्या कानाकोपऱ्यात झाला. हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि अन्य ठिकाणच्या नव्या गोडाऊनमुळे पुरवठा साखळीतील लाखो हंगामी रोजगारांची निर्मिती झाली. त्यामध्ये सॉर्टर्स, पिकर्स, पॅकर्स आणि वितरण अधिकारी या रोजगारांचा समावेश आहे. या उत्सव हंगामात फ्लिपकार्टने १,१५,००० रोजगार दिले. तर २०१९ मध्ये ५०,००० आणि २०२० मध्ये ७०,००० रोजगार दिले होते.

यंदाचा टीबीबीडी हा गेल्या आठ वर्षांच्या इतिहासातील सर्वात समावेशक आणि शाश्वत आहे. खासकरून फ्लिपकार्ट अँप आता ११ भारतीय भाषेतून उपलब्ध असून त्यातून देशभरातील ग्राहक अखंडितपणे ई – कॉमर्स अनुभव घेत आहेत. तसेच बहुतांश शिपमेंट या टिकाऊ पॅकिंगमध्ये देशभरात इलेक्ट्रिक वाहनांद्वारे वितरित केल्या जात आहेत.

लोकशाही दृष्टिकोन आणि उत्पादनांच्या निवडीच्या विस्तारामुळे, टायर – २ दर्जाची शहरे आणि त्यापुढील गावांमधील ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास व खप वाढवण्यास मदत झाली आहे.