विजयादशमी: सर्जिकल स्ट्राईकचे नायक लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर करणार देशाच्या सैनिकांना वंदन

विजयादशमीच्या या शुभप्रसंगी, जनरल निंबोरकर यांच्यासह संपूर्ण टीम संपूर्ण भारतवासीयांच्या वतीने काश्मीर सीमेवर भारतीय सैन्याचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना भारतीयांनी दिलेल्या प्रेम आणि सौहार्दाच्या भेटीद्वारे संदेश देण्यासाठी जात आहे.

    मुंबई: सर्जिकल स्ट्राईकचे नायक लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर विजयादशीच्या निमित्ताने देशासाठी अहोरात्र झटणा-या सैनिकांना वंदन करण्यासाठी उद्या काश्मीर बॉर्डरवर जाणार आहेत. वयम् ॲपचे संस्थापक गौरव त्रिपाठी, भारत माता महिला मंडळाच्या प्रियांका शिंदे आणि इतर देशभक्त नागरिकदेखील सैनिकांना वंदन करण्यासाठी त्यांना साथ देणार आहेत.

    या कार्यक्रमाला इच्छा असूनही जाऊ न शकणा-या भारतवासीयांना हा कार्यक्रम वयम् ॲपवर पाहता येईल. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शुक्रवार दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १:३० वाजता वयम् ॲपवर होणार आहे. यासाठी नागरिकांना https://utsav.vayam.app/vijayadashami या लिंकवर जावे लागेल. यावेळी सैनिकांना भेट म्हणून मिठाईदेखील देण्यात येणार आहे.

    विजयादशमीच्या या शुभप्रसंगी, जनरल निंबोरकर यांच्यासह संपूर्ण टीम संपूर्ण भारतवासीयांच्या वतीने काश्मीर सीमेवर भारतीय सैन्याचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना भारतीयांनी दिलेल्या प्रेम आणि सौहार्दाच्या भेटीद्वारे संदेश देण्यासाठी जात आहे. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे काश्मीरला भारतीय संस्कृतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा पुढाकार स्तुत्य असून जनरल निंबोरकर आपल्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पुढे नेत आहेत. या कार्यक्रमात भारत माता महिला मंडळ ट्रस्ट, पुणे आणि वयम टीम पूर्ण उत्साहाने सहभागी झाली आहे.