जबरदस्त! WhatsApp च्या या नव्या फीचरमुळे आपोआप डिलीट होतील एकदा बघितलेले फोटो, व्हिडीओ मेसेज

WhatsAppचे नवे फीचर अ‍ॅक्टिव्ह केल्यानंतर चॅटमधील व्हिडीओ आणि फोटो आपोआप डिलीट होतील..आयओएससह अँड्राइड बीटा यूजर्ससाठी देखील हे फीचर उपलब्ध आहे. हे फीचर ऍक्टिव्ह केल्यानंतर रिसिव्हर आणि सेंडर दोन्हींच्या फोनमधील मेसेज आपोआप डिलीट होतील. यासोबतच, यूजर्स मेसेज इंफो ऑप्शनमध्ये जाऊन मेसेज कधी डिलिव्हर झाला आणि कधी पाहिला याची माहिती घेऊ शकतात.

    नवी दिल्ली :इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsAppने एक जबरदस्त फिचर आणले आहे. हे फीचर अ‍ॅक्टिव्ह केल्यानंतर चॅटमधील व्हिडीओ आणि फोटो आपोआप डिलीट होतील.हे फिचर WhatsAppने iOS बीटा यूजर्ससाठी Disappearing messages फीचर्सला व्ह्यू वन्स नावाने जारी केले आहे. स्नॅपचॅटच्या फिचरप्रमाणे हे काम करते.

    काय आहे खास
    WhatsAppचे नवे फीचर अ‍ॅक्टिव्ह केल्यानंतर चॅटमधील व्हिडीओ आणि फोटो आपोआप डिलीट होतील..आयओएससह अँड्राइड बीटा यूजर्ससाठी देखील हे फीचर उपलब्ध आहे. हे फीचर ऍक्टिव्ह केल्यानंतर रिसिव्हर आणि सेंडर दोन्हींच्या फोनमधील मेसेज आपोआप डिलीट होतील. यासोबतच, यूजर्स मेसेज इंफो ऑप्शनमध्ये जाऊन मेसेज कधी डिलिव्हर झाला आणि कधी पाहिला याची माहिती घेऊ शकतात. या फीचरमध्ये सध्या काही त्रुटी आहेत, ज्या दुरुस्त केल्या जात आहेत. सध्या हे फीचर बीटा व्हर्जन यूजर्ससाठी उपलब्ध आहे. पण, view once फीचर लवकरच सर्व यूजर्ससाठी रोलआउट केले जाईल.