Vivo चा भारतीय बाजारात स्मार्टफोन लाँचिंगचा धडाका, फीचर्स झाले लीक , जाणून घ्या

Vivo V21 Pro या महिन्याच्या अखेरीस लाँच केला जाऊ शकतो, तर Vivo Y72 5G 15 जुलै रोजी लाँच केला जाईल. फोन दोन रंगांमध्ये सादर केला जाईल. ज्यात ड्रीम ग्लो आणि ग्रेफाइट ब्लॅक कलरचा समावेश आहे.

    Vivo V21 Pro आणि Vivo Y72 5G हे दोन्ही स्मार्टफोन या महिन्यात लॉन्च केले जाऊ शकतात. दरम्यान, या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमती लीक झाल्या आहेत. मार्च महिन्यात व्हिवो वाय 72 5 जी थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आला होता. या दोन फोन्सच्या किंमतींबद्दल काही माहिती लीक झाली आहे. त्यानुसार व्हिवो व्ही 21 प्रो ची किंमत 33,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर व्हिवो वाय 72 5 जीची किंमत 23,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

    Vivo Y72 5G मध्ये 6.58 इंचाचा FHD+ LCD IPS डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो 1080 × 2408 पिक्सेल रिझोल्यूशनसह येईल. या फोनच्या इंडियन व्हेरिएंटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 700 SoC प्रोसेसर दिला जाऊ शकतो. चिपसेट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह देण्यात येईल. हा हँडसेट फनटच ओएस 11.1 आधारित अँड्रॉइड 11 वर काम करेल.

    Vivo V21 Pro या महिन्याच्या अखेरीस लाँच केला जाऊ शकतो, तर Vivo Y72 5G 15 जुलै रोजी लाँच केला जाईल. फोन दोन रंगांमध्ये सादर केला जाईल. ज्यात ड्रीम ग्लो आणि ग्रेफाइट ब्लॅक कलरचा समावेश आहे.