शास्त्रज्ञांनी केला ‘स्फोटक’ प्रयोग, पाण्यापासून बनवले सोने!

सोडियम-पोटॅशियम सारख्या प्रतिक्रियाशील घटकांचा समूह वापरण्यात आला. मात्र यात देखील एक आव्हान होते कारण जेव्हा या समूहाचा पाण्याशी संपर्क साधला जातो तेव्हा त्याचे रूपांतर भयंकर स्फोटकांमध्ये होते. यासाठी, असा प्रयोग तयार केला गेला की जेणेकरून प्रतिक्रिया मंद होईल आणि स्फोट होणार नाही.

  प्राग : पृथ्वीवर सर्वात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे तर सोने दुर्मिळ आहे. आता संशोधकांनी पाण्यापासून ‘सोने’ बनवले आहे. प्राग येथील चेक अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये भौतिक रसायनशास्त्रज्ञांनी हा प्रयोग केला आहे. त्यांनी पाण्याचे सोनेरी, चमकदार धातूमध्ये रूपांतर केले आणि तेही एका अनोख्या तंत्राने! ( Scientists make gold from water)

  पाणी धातू बनू शकते का?
  सहसा एखाद्या गोष्टीवर जास्त दबाव टाकल्याने त्याचे रूपांतर धातूमध्ये बदलू शकते हा प्रयोग यात करण्यात आला आहे . पाण्यात असलेले अणू किंवा रेणू इतके जवळ येतात की त्यांचे बाह्य इलेक्ट्रॉन शेअर होतात आणि त्यांच्याद्वारे वीज तयार करता येते. अशाच प्रकारे पाण्यावर १.५ दशलक्ष वातावरणाचा दाब लावूनही हे करणे शक्य आहे मात्र सध्याच्या प्रयोगशाळेच्या तंत्रज्ञानात हे करणे शक्य नाही. म्हणून या नव्या अभ्यासाचे सहलेखक पावेल जंगवर्थ यांनी यासाठी आणखी एक पद्धत तयार केली. इलेक्ट्रॉन शेअरिंगसाठी त्यांनी alkali metalचा वापर केला.

  प्रयोग कसा झाला
  यात सोडियम-पोटॅशियम सारख्या प्रतिक्रियाशील घटकांचा समूह वापरण्यात आला. मात्र यात देखील एक आव्हान होते कारण जेव्हा या समूहाचा पाण्याशी संपर्क साधला जातो तेव्हा त्याचे रूपांतर भयंकर स्फोटकांमध्ये होते. यासाठी, असा प्रयोग तयार केला गेला की जेणेकरून प्रतिक्रिया मंद होईल आणि स्फोट होणार नाही. यात एक सिरिंज पोटॅशियम आणि सोडियमने भरले, हे घटक खोली तापमानावर द्रवरूपात होते आणि व्हॅक्यूम चेंबरमध्ये ठेवले गेले.

  … आणि सोने झाले
  यानंतर, या मिश्रणाचे थेंब सिरिंजमधून काढले गेले ज्यात थोड्या प्रमाणात स्टीम देण्यात आली. या थेंबांवरील पाणी काही सेकंदांसाठी गोठले. अपेक्षेप्रमाणे, मिश्रणाच्या थेंबापासून इलेक्ट्रॉन पाण्यात गेले आणि काही सेकंदांसाठी पाणी सोनेरी झाले.