काय सांगता?  आकाशगंगेमध्ये पृथ्वीसारखे सहा अब्ज ग्रह असण्याची शक्यता

अंतराळाचे कुतूहल असणार नाही असा व्यक्ती शोधून सापडणार नाही. या विश्वात आपण मानव एकटेच आहोत की वैश्विक पसाऱ्यात इतरही कुठे आपल्यासारखी वस्ती आहे का ? असेल तर कशी असेल आपल्या सारखीच माणसे असतील

 
अंतराळाचे कुतूहल असणार नाही असा व्यक्ती शोधून सापडणार नाही. या विश्वात आपण मानव एकटेच आहोत की वैश्विक पसाऱ्यात इतरही कुठे आपल्यासारखी वस्ती आहे का ? असेल तर कशी असेल आपल्या सारखीच माणसे असतील की हॉलिवूड चित्रपटात दाखवतात तसे “एलिअन्स” असतील असे नानाविध प्रश्न प्रत्येकाला पडतात. याच प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न  जगभरातील शास्त्रज्ञ  करत आहेत.  अंतराळात पृथ्वीसारखे आपण ‘एकटे’च नसल्याचा ठाम विश्वास अंतराळ संशोधकांना आहे. यासाठी तंत्रप्रगतीच्या या शतकात  पृथ्वीसमान ग्रहांना हुडकून काढण्याची नवी पद्धती शास्त्रज्ञांनी विकसित केली असून, त्यांच्या मते आपल्या एकटय़ा आकाशगंगेमध्ये पृथ्वीसारखे सहा अब्ज ग्रह असण्याची शक्यता आहे. 
 
द अ‍ॅस्ट्रोनोमिकल जर्नलमध्ये,  हे ग्रह पृथ्वीहून अधिक उष्ण असावेत, तर थंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  ताऱ्याजवळ (जी टाईप ) असलेल्या काही ग्रहांवर आपल्या पृथ्वीसारखेच तापमान असू शकते,  असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान अनेक पृथ्वीसदृश ग्रहांची गर्दी आहे. द अ‍ॅस्ट्रोनोमिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की पूर्वी असे मानले जात होते की प्रत्येक जी-टाइप तारासाठी पृथ्वीसारखे अंदाजे ०.०२ ग्रह आहेत. आता, नासाच्या केप्लर ग्रह-शोध कार्यक्रमाच्या माहितीच्या आधारे, ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी प्रत्येक जी-प्रकार तारेसाठी ०.१८ पृथ्वीसारखे ग्रह असण्याची शक्यता वर्तवली आहे   या संशोधनातून या ग्रहांपैकी कुठे जीवसृष्टी आहे का, याचा पडताळा शोधणे आवश्यक आहे यामुळे अंतराळ संशोधन आणखी एक पाऊल पुढे मात्र नक्कीच गेलेले असल्याचे म्हटले जात आहे.