भल्या मोठ्या जहाजांमधले इंधन वाटेतच संपले तर काय होईल? जाणून घ्या रंजक माहिती

अशा प्रवासी जहाजांमध्ये "हेवी फ्युएल ऑईल"(HFL) इंधन म्हणून वापरले जाते. पृथ्वीवर उपलब्ध असलेले सर्वात अस्वच्छ इंधन आहे.

    प्रवासी जहाजांवर हॉटेल्स तसेच इतर चैनीच्या वस्तू व सेवा पुरवल्या जातात त्यामुळे त्यांमध्ये व्यापारी जहाजांपेक्षा जास्त इंधनाची आवश्यकता असते. तसेच अशी जहाजे व्यापारी जहाजणप्रमाने समुद्राच्या मध्यातून प्रवास न करता, किनारपट्टीलगत प्रवास करतात त्यामुळे अधिक इंधन वापरले जाते. अशा प्रवासी जहाजांमध्ये “हेवी फ्युएल ऑईल”(HFL) इंधन म्हणून वापरले जाते. पृथ्वीवर उपलब्ध असलेले सर्वात अस्वच्छ इंधन आहे.

    HFL मध्ये ३५००० ppm सल्फर कंटेंट असतो, जे प्रमाण डिझेल मधील प्रमाणाच्या ३५०० पट आहे. म्हणूनच अत्यंत प्रदूषणकारी असल्यामुळे याला अस्वच्छ इंधन म्हणतात. तसेच अशी जहाजे किनाऱ्यालगत प्रवास करत असल्याने समुद्रकिनाऱ्यांची मोठी हानी त्यामुळे होते.

    हे इंधन संपून जहाज समुद्रात थांबण्याची किती शक्यता आहे?

    अशा घटनांची शक्यता दुर्मिळ आहे. कारण साधी गोष्ट आहे. अगदी कारने ही कुठल्या प्रवासाला निघत असताना आपण आवश्यक तेवढे इंधन भरूनच निघत असतो. किंवा रस्त्यात कुठे इंधनाची आवश्यकता भासली तर इंधन पंप असतातच. जहाजांचेही तसेच आहे. सफरीवर निघण्यापूर्वी निर्गमन आणि गंतव्य स्थानांमधील अंतर विचारात घेऊन आवश्यक तेवढे इंधन बंदरातून निघतानाच बरोबर घेतले जाते. तसेच आपत्कालीन परिस्थितीत व खराब हवामानाचा अंदाज घेऊन आवश्यकतेपेक्षा ५०% अधिक इंधनाची तरतूद करूनच जहाजे प्रवासाला निघतात.