whats app

प्रायव्हसी पॉलिसी बदलल्याामुळे मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्स ॲप (WhatsApp) वर सगळेच नाराज आहेत. अशात आता कंपनीने आपल्या नवीन पॉलिसीबाबत एक स्पष्टीकरण दिलं आहे.

प्रायव्हसी पॉलिसी बदलल्याामुळे मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्स ॲप (WhatsApp) वर सगळेच नाराज आहेत. अशात आता कंपनीने आपल्या नवीन पॉलिसीबाबत एक स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीने आपल्या स्पष्टीकरणामध्ये असे म्हटले आहे की, पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनीयतेवर कोणताही परिणाम होत नाही. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे.

व्हॉट्स ॲप कंपनीने असे सांगितले आहे की, ‘तुमचे खासगी मेसेज आधीप्रमाणेच १०० टक्के एंड-टू-एंड एन्क्रिप्शनअंतर्गत सुरक्षित राहतील. पॉलिसी बदलल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनीयतेवर परिणाम होणार नाही. कंपनीने याबाबत दुसऱ्यांदा स्पष्टीकरण दिलं आहे.

व्हॉट्स ॲपने ट्विटसोबतच ब्लॉगची एक लिंकही शेअर केली आहे. पॉलिसीमध्ये झालेला बदल केवळ बिजनेस युजर्ससाठी असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. खासगी चॅटिंगवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. फेसबुक कंपनी व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची चॅटिंग वाचू शकणार नाही किंवा युजर्सची कॉन्टॅक्ट लिस्टही फेसबुकसोबत शेअऱ केली जाणार नाही, असं त्यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे.