whatsapp clarifies on privacy policy update amid criticism says no effect on individual chats and calls nrvb
WhatsApp चे स्पष्टीकरण : प्रायव्हेट चॅट राहणार सुरक्षित, बदल फक्त 'या' अकाऊंटसाठीच असतील

आम्ही आपल्याला हेही सांगू इच्छितो की, आम्ही खासगी संदेश एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह पूर्वीप्रमाणेच सुरक्षित ठेवणार आहोत. प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केल्याने आपले मित्र आणि परिवारसोबत करण्यात येणाऱ्या संदेशांवर कोणताच प्रभाव पडणार नसल्याचे म्हटले आहे.

नवीन पॉलिसीबाबत चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर फेसबुकचा मलकी हक्क असलेल्या व्हॉट्सॲपने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. WhatsApp ने नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत स्पष्ट केलं आहे की, यामुळे मित्र आणि परिवारातील सदस्यांसोबत होणाऱ्या वैयक्तिक चॅटिंगवर काहीही प्रभाव पडणार नाही. नवीन पॉलिसी फक्त बिझनेस अकाउंटसाठी असणार आहे. WhatsApp ने ट्विट करत ही माहिती दिली आहे. युजर्सचे चॅट्स पूर्वीप्रमाणेच एंड-टू-एंड एंक्रिप्शनसह पूर्णपणे सुरक्षित आहेत असं स्पष्ट केलं आहे.

WhatsApp ने ट्विट मध्ये म्हटलं आहे की, आम्ही या अफवाचं आलेलं पीक पूर्णपणे दूर करणार आहोत. सोबतच आम्ही आपल्याला हेही सांगू इच्छितो की, आम्ही खासगी संदेश एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह पूर्वीप्रमाणेच सुरक्षित ठेवणार आहोत. प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केल्याने आपले मित्र आणि परिवारसोबत करण्यात येणाऱ्या संदेशांवर कोणताच प्रभाव पडणार नसल्याचे म्हटले आहे.

WhatsApp ने आपल्या स्पष्टीकरणात काय सांगितलं आहे

WhatsApp ने ट्विट सोबतच आपल्या ब्लॉगची लिंकही शेअर केली आहे नवीन पॉलिसीवर होणाऱ्या वादावर WhatsAppचं म्हणणं आहे की, हे बदल फक्त बिझनेस अकाऊंटसाठीच असणार आहेत. वैक्तिगत चॅट्सवर याचा काहीही परिणाम होणार नाही. ब्लॉगमध्ये स्पष्ट लिहिलं आहे व्हॉट्सॲपच्या मालकी हक्काची कंपनी फेसबुक युजर्सचे चॅट्स वाचूच शकणार नाही आणि युजर्सचे कॉन्टॅक्ट लिस्टही फेसबुकसोबत शेअर करणार नाही.
WhatsApp तुमचे खासगी मेसेजेस वाचत नाही आणि तुमचे कॉल्सही ऐकत नाही, एवढंच नाही तर, ते फेसबुकलाही तसं करू देत नाही.
WhatsApp तुमचे मेसेज आणि कॉल हिस्ट्रीही स्टोर करत नाही.
WhatsApp द्वारे शेअर केलेले लोकेशन पहात नाही आणि ते फेसबुकसोबत शेअरही करत नाही.
WhatsApp तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट फेसबुकसोबत शेअरही करत नाही.
WhatsApp ग्रुप आजही पूर्णपणे खासगीच आहे.
तुम्ही तुमचे मेसेजेस आपोआप डिलीट होण्याचा कालावधीही सेट करू शकता.
तुम्ही तुमचा WhatsApp डेटा डाऊनलोडही करू शकता.

WhatsApp ने स्पष्टीकरण दिल्यानंतरही प्रश्न थांबलेलेच नाहीत

व्हॉट्सॲपचं म्हणणं आहे की, त्याच्या नवीन पॉलिसीमुळे खासगी चॅट्स प्रभावित होणार नाहीत तर मग सर्व युजर्ससाठी ही पॉलिसी अनिवार्य का आहे?

व्हॉट्सॲपच्या मते, फक्त बिझनेस अकाऊंटचे चॅट फेसबुकसोबत शेअर करण्यात येईल मग हा नियम बिझनेस टू बिझनेस आणि बिझनेस ते खासगी अकाऊंट अशा दोन्ही प्रकारच्या अकाऊंट्सला लागू होणार का?

जेव्हा व्हॉट्सॲप बिझनेस अकाऊंटवरून होणारे चॅट वाचेल आणि फेसबुकसोबत शेअर करेल तर याची काय खात्री आहे की, ते खासगी चॅट्स वाचणार नाही, कारण ॲक्सेस तर कंपनीने आधीच घेऊन ठेवला आहे. युजर्सच्या नियम आणि अटींबाबत सहमतीही दर्शविण्यात आली आहे.