इंटरनेट नाही, बॅटरी संपली, तरी टेन्शन कायकू लेनेका ‘असे’ आरामात वापरा Whatsapp

Whatsapp New Feature : व्हॉट्सॲप वापरणाऱ्या अब्जावधी युझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. Whatsapp ने नॉन-बीटा युझर्ससाठी मल्टी-डिव्हाइस फंक्शनॅलिटी फीचर (multi devices functionality feature) देखील लाँच (launch) केले आहे.

    या फिचर्सच्या माध्यमातून युझर्स त्यांचे व्हॉट्सॲप (Whatsapp) एकावेळी एकापेक्षा जास्त डिव्हाईसला कनेक्ट (Other than one Device) करू शकतील. म्हणजेच आपल्या स्मार्टफोन (Smartphone) व्यतिरिक्त, आपण लॅपटॉप (laptop) इत्यादीवर व्हॉट्सॲप वापरण्यास सक्षम असाल. आतापर्यंत हे फिचर फक्त बीटा युझर्ससाठी (beta users) उपलब्ध होते.

    Whatsapp Feature : चार स्वतंत्र डिव्हाईसमध्ये वापरता येणार

    व्हॉट्सॲप ट्रॅकर WABetaInfo च्या मते, या नवीन फीचर्ससह, युझर्स त्यांचे व्हॉट्सॲप अकाऊंट प्रायमरी डिव्हाइस व्यतिरिक्त चार वेगवेगळ्या डिव्हाईला कनेक्ट करू शकतील.

    तथापि, यापैकी कोणतेही डिव्हाईस दुसरा फोन असू शकत नाही. हे नवीन फिचर्स जूनमध्ये लाँच करण्यात आले. मल्टी-डिव्हाइस फंक्शनॅलिटीच्या माध्यमातून युझर्स प्रायमरी डिव्हाइसशी कनेक्ट न करता इतर नॉन फोन डिव्हाइसवर व्हॉट्सॲप वापरू शकतात.

    Whatsapp Feature : इंटरनेट नसले तरी व्हॉट्सॲप वापरता येणार

    या नवीन फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसेल किंवा बंद असेल तरीही व्हॉट्सॲप खाते चार वेगवेगळ्या डिव्हाईसवर चालवता येईल. स्मार्टफोनमध्ये इंटरनेट नसले तरीही तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर वाय-फायशी जोडलेल्या टॅबवर व्हॉट्सॲप वापरू शकता.

    व्हॉट्सॲपमध्ये मल्टी-डिव्हाइस सपोर्ट कसे सक्रिय करावे?

    सर्वप्रथम आपले WhatsApp अकाउंट उघडा.

    होम पेजच्या उजव्या बाजूला तीन-बिंदू मेनू चिन्हावर जा.

    लिंक्ड डिव्हाइसेसवर टॅप करा.

    मल्टी-डिव्हाइस बीटा वर टॅप करा.

    येथे तुम्ही जॉइन बीटा किंवा लीव्ह बीटा वर टॅप करू शकता.