WhatsApp ने सगळं टेन्शनच केलं खल्लास, एका क्लिकवर करता येणार पेमेंट, तुम्ही अपडेट केलं का?

व्हॉट्सॲपच्या अपडेट्सपैकी (Whatsapp Updates) एक म्हणजेच पेमेंट्स फीचर (payments Feature). जे युजर्सना व्हॉट्सॲपद्वारे आपल्या मित्र आणि नातेवाईकांकडून पैसे पाठवण्याची (Send Money) किंवा प्राप्त करण्याची (Receive money) परवानगी देते. आता अलीकडेच हे वैशिष्ट्य अधिक मनोरंजक करण्यात आले आहे. जाणून घ्या कसे ?

    नवी दिल्ली: केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगातच WhatsApp Users ची संख्या मोठी आहे. कंपनीच्या सातत्याने येणाऱ्या नव-नवीन अपडेट्स मुळे हे App युजर्सच्या पसंतीचे झाले आहे. गेल्या काही महिन्यांत, लोकप्रिय मेसेजिंग ॲप, WhatsApp ने अनेक नवीन अपडेट्स (New Updates) जारी केले असून ते युजर्सना देखील भुरळ घालत आहेत. त्यापैकी एक WhatsApp Payment Feature देखील आहे. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही मित्र आणि नातेवाईकांना सहज पैसे पाठवू शकाल. व्हॉट्सॲपचे हे पेमेंट फीचर युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) वर आधारित आहे. जेणेकरून तुम्ही थेट मोबाइल ॲपवरून पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकाल. पाहा यात नेमका काय बदल झाला आहे.

    WhatsApp चॅटबॉक्समध्ये असणार ‘₹’ चिन्ह :

    अलीकडेच WhatsApp बनवणाऱ्या Facebook ने आपल्या भारतीय युजर्ससाठी एक विशेष अपडेट जारी केले आहे. हा बदल व्हॉट्सॲप पेमेंट्स फीचरशी संबंधित आहे. कंपनीने ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल (GFF) 2021 मध्ये जाहीर केले आहे की, आतापासून सर्व व्हॉट्सॲप युजर्सच्या चॅट बॉक्समध्ये ‘₹’ रुपयाचे चिन्ह जारी केले जाईल, ज्यामुळे व्हॉट्सॲप पेमेंट फीचर वापरणे सोपे होणार आहे.

    यासह, व्हॉट्सॲपच्या चॅट बॉक्समधील कॅमेरा आयकॉन युजर्सना भारतातील 20 दशलक्षाहून अधिक स्टोअरमध्ये कोणताही क्यूआर कोड स्कॅन करून हे वैशिष्ट्य वापरण्याची परवानगी देईल. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने व्हॉट्सॲपचे फेज वाइज पेमेंट्स फीचर जारी केले होते अशी माहिती फेसबुकने देखील जारी केली आहे.