WhatsApp चं नवं अपडेट येऊ घातलंय; इंटरनेट विनाही होणार चॅटिंगची सोय

व्हॉट्सअ‍ॅप सध्या आयओएस (iOS) आणि अँड्रॉईड बीटा (Android Beta) युजर्ससाठी, व्हॉट्सअ‍ॅप वेब बीटा प्रोग्रामवर (WhatsApp Web Beta Program) काम करत आहे, जो युजर्सला आपल्या स्मार्टफोनच्या इंटरनेटशी (Internet) कनेक्ट केल्याविनाच WhatsApp Web चा वापर करता येऊ शकतो.

  नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. फेसबुकच्या (Facebook) मालकीचं असलेला मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप आयओएस (iOS) आणि अँड्रॉईड बीटा (Android Beta) युजर्ससाठी, व्हॉट्सअ‍ॅप वेब बीटा प्रोग्रामवर (WhatsApp Web Beta Program) काम करत आहे, जो युजर्सला आपल्या स्मार्टफोनच्या इंटरनेटशी (Internet) कनेक्ट केल्याशिवाय WhatsApp Web चा वापर करता येऊ शकतो.

  व्हॉट्सअ‍ॅपला ट्रॅक करणारी वेबसाईट WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, ही सर्विस व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर (WhatsApp Messenger) आणि व्हॉट्सअ‍ॅप बिजनेस अ‍ॅप (WhatsApp Business App) दोघांसाठी असेल. मल्टी डिव्हाईस सपोर्ट फंक्शनचं (Multi-Device Support) टेस्टिंग करण्यासाठी अ‍ॅपची मदत करणार आहे.

  व्हॉट्सअ‍ॅप डेव्हलपमेंट ट्रॅक करणारी साईट WABetaInfo ने ही माहिती शेअर केली आहे. ‘आपल्या फोनच्या इंटरनेटशी कनेक्ट केल्याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप वेबचा वापर करण्यासाठी, व्हॉट्सअ‍ॅप आयओएस आणि अँड्रॉईड बीटा युजर्ससाठी एक व्हॉट्सअ‍ॅप वेब बीटा प्रोग्रॅम येईल.’, असं सांगण्यात आलं आहे. WABetaInfo ने एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे, ज्यात व्हॉट्सअ‍ॅप वेबचं फीचर Delete for Everyone प्रत्येकासाठी व्हॉट्सअ‍ॅप वेब बीटा प्रोग्राममध्ये सामिल झाल्यानंतर काम करणार नाही, असंही सांगण्यात आलं आहे.

  व्हॉट्सअ‍ॅपने दिलेल्या माहितीनुसार, या प्रोग्राममध्ये दुसऱ्या युजर्ससह चॅट करण्यासाठी युजर्सला अ‍ॅपच्या लेटेस्ट वर्जनमध्ये अपडेट करण्याची आवश्यकता आहे. जर दुसरा युझर व्हॉट्सअ‍ॅपच्या लेटेस्ट वर्जनचा वापर करत नसेल, तर कॉल आणि मेसेज दोन्हीला सपोर्ट केलं जाणार नाही.

  या प्रोग्राममध्ये सामिल होणारे युझर्स एकाचवेळी फेसबुक पोर्टलसह चार डेस्कटॉप डिव्हाईसला लिंक करू शकतील. तसंच या प्रोग्राममध्ये सामिल होण्याचा पर्याय व्हॉट्सअ‍ॅप वेब-डेस्कटॉप ऑप्शनअंतर्गत सेटिंग्ज मेन्यूमध्ये उपलब्ध असेल.

  एकदा युजर्सनी व्हॉट्सअ‍ॅप वेब बीटा प्रोग्रामवर क्लिक केल्यानंतर, त्यांना एका मेसेज पाठवला जाईल की, ‘नव्या व्हॉट्सअ‍ॅप वेब बीटामध्ये सामिल झाल्यानंतर तुम्हाला आपल्या फोनला कनेक्ट करण्याची गरज नाही’. त्यानंतर ‘Got it’ बटणावर क्लिक केल्यानंतर युजर्स यात Enroll करू शकतात. सध्या हे उपलब्ध नसून यावर काम सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.