whatsapp private group access google search bug found in it nrvb
WhatsApp चे नंबर्स आणि ग्रुप झळकले गुगल सर्चवर; पोस्ट व्हायरल झाल्यावर कंपनीने दिलेलं स्टेटमेंट वाचाच

याआधी गुगल सर्चमध्ये व्हॉट्सॲप प्रोफाइलही दिसू लागले आहेत. ही माहिती व्हायरल झाल्यानंतर व्हॉट्सॲपने त्यांची चूक दुरस्त केली आहे. हा प्रकार अधिक गंभीर आहे कारण कोणत्याही ग्रुपमध्ये कुणीही जॉइन करू शकतो.

WhatsApp आपल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे झुक्याभाऊंची कंपनी भलतीच चर्चेत आली आहे. नव्या प्रायव्हसी पॉलिसीत WhatsApp ने स्पष्ट केले आहे की युजर्सचे चॅट सुरक्षित आहे. मात्र युजर डेटावर फेसबुकचं पूर्ण लक्ष राहणार आहे. आता WhatsAppची आणखी एक कमतरता समोर आली आहे. वर्षभरापूर्वीच यावर चर्चा सुरू झाली आहे.

एकदा पुन्हा WhatsApp ग्रुप्स गुगल सर्चमध्ये दिसत आहेत. म्हणजे युझर्स कोणतेही प्रायव्हेट WhatsApp ग्रुप गुगल सर्च करून जॉइन करू शकतात. याआधी 2019 मध्ये व्हॉट्सॲप ग्रुप गुगल सर्चमध्ये दिसू लागले होते. यानंतर कंपनीने स्पष्टीकरण देत यामध्ये काही बदल केले.

याआधी गुगल सर्चमध्ये व्हॉट्सॲप प्रोफाइलही दिसू लागले आहेत. ही माहिती व्हायरल झाल्यानंतर व्हॉट्सॲपने त्यांची चूक दुरस्त केली आहे. हा प्रकार अधिक गंभीर आहे कारण कोणत्याही ग्रुपमध्ये कुणीही जॉइन करू शकतो.

WhatsApp मधील कमतरता पुन्हा एकदा समोर आली आहे. मात्र हा बग आहे का हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र ही चूक दुरुस्त करण्यात आल्याचे स्टेटमेंट एका न्यूज पोर्टलला कळवले असल्याची माहिती व्हॉट्सॲपने दिली आहे.