‘व्हॉट्सअ‍ॅप’मधील बदलांमुळे निर्माण झाला आहे मोठा धोका? मग आता याला पर्याय काय?

वापरकर्ता ज्या वेगवेगळ्या यंत्रणांशी जोडलेला असेल त्याची विस्तृत माहिती सहजपणे उघड होणार आहे.महत्त्वाचे म्हणजे भारतात अनेक शाळा, गृहनिर्माण संस्था यांची माहिती, संवाद व्हॉट्सअ‍ॅपवर असल्याने भारतातील विद्यार्थ्यांची माहिती, त्यांचे ठिकाण, शाळा अशी माहिती सहज उघड होऊ शकते. थोडक्यात काय तर अतिशय खासगी आणि क्षुल्लक माहितीसुद्धा या नव्या धोरणामुळे उघड होऊ शकते.

फेसबुकने २०१४ मध्ये १९ अब्ज डॉलरमध्ये व्हॉट्सअ‍ॅपची खरेदी केले होते. सप्टेंबर २०१६ पासून व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या वापरकर्त्यांची माहिती फेसबुकसोबत शेअर करायला सुरुवात केली होती. आता व्हॉट्सअ‍ॅपने नवीन गोपनीयतेच्या धोरणांमध्ये फेसबुक आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांसोबत आपल्या वापरकर्त्यांची माहिती आदान-प्रदान करण्याचा स्पष्ट उल्लेख केला होता.

व्हॉट्सअ‍ॅपने ४ जानेवारीला आपल्या नव्या सेवा शर्ती (टर्म ऑफ सर्व्हिस) जाहीर केल्या आहेत. त्या ८ फेब्रुवारीपासून लागू केल्या जाणार आहेत. त्या संदर्भातल्या सूचना ‘अ‍ॅण्ड्रॉइड’ आणि ‘आयओएस’ वापरकर्त्यांना देण्यात येत आहेत. तुम्हाला जर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर यापुढेही करायचा असेल तर तुम्हाला नवीन नियम आणि अटी स्वीकारणं अनिवार्य असणार आहे किंवा तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचा वापर थांबवू शकता, असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप तुमच्यावर सहमतीची सक्तीच करत आहे.

‘आमच्या गोपनीयता धोरणांमुळे आम्हाला आमची माहितीसंबंधीची धोरणे तपासायला मदत होते,’ असे सांगण्यात येत आहे. वापरकर्ता ज्या वेगवेगळ्या यंत्रणांशी जोडलेला असेल त्याची विस्तृत माहिती सहजपणे उघड होणार आहे.महत्त्वाचे म्हणजे भारतात अनेक शाळा, गृहनिर्माण संस्था यांची माहिती, संवाद व्हॉट्सअ‍ॅपवर असल्याने भारतातील विद्यार्थ्यांची माहिती, त्यांचे ठिकाण, शाळा अशी माहिती सहज उघड होऊ शकते. थोडक्यात काय तर अतिशय खासगी आणि क्षुल्लक माहितीसुद्धा या नव्या धोरणामुळे उघड होऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांचा इंटरनेट प्रोटोकॉल अ‍ॅड्रेस (आयपी अ‍ॅड्रेस) फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा दुसऱ्या कुणालाही देऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉप, संगणकाशी संबंधित बॅटरी लेव्हल, सिग्नल स्ट्रेंग्थ, अप व्हर्जन, ब्राऊझरशी संबंधित माहिती तसेच भाषा, फोन नंबर, मोबाइल आणि इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपनी यांसारखी माहितीही एकत्र करू शकेल.

व्हॉट्सअ‍ॅपची नवी धोरणे मान्य नसल्यास ८ फेब्रुवारीपासून खाते बंद होऊ शकते. अशा वेळी सिग्नल किंवा टेलिग्राम हे पर्यायी अ‍ॅप वापरता येऊ शकतात. त्यातही सिग्नल हे अ‍ॅप वापरण्यासाठी सुरक्षित आहे. मात्र त्यातील वैशिष्टय़े वापरण्यास थोडी अवघड वाटू शकतात. संपर्क जाळे वाढविण्यासाठी हे दोन्ही अ‍ॅप वापरताना आपल्या संपर्कातील व्यक्तींनी किंवा संस्थांनी त्याचा वापरच केला नाही तर हे पर्याय वापरूनही फायदा होणार नाही. ज्या ज्या देशांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकची कार्यालये आहेत, तिथे वापरकर्त्यांची खासगी माहिती पाठवली जाऊ शकते.

नवीन धोरणानुसार तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपची काही वैशिष्टय़े वापरली नाहीत, तरीही तुमचा आयपी अ‍ॅड्रेस, फोन नंबर, देश आणि शहरासारखी माहिती व्हॉट्सअ‍ॅपकडे असेल. फेसबुकसह ज्या कंपन्या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपली उत्पादने व सेवा देऊ करतात त्यांना तुमची माहिती पुरवली जाऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅपने भारतात निधी हस्तांतरण सेवा सुरू केली आहे. त्या सेवेचा लाभ घेत असल्यास व्हॉट्सअ‍ॅपला तुमची आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधित माहितीही पुरवली जाऊ शकते.