whatsapp wont work on old iphones android smart phones in new year 2021

नवीन वर्षात जुने आयफोन (iPhone) आणि अँड्रॉइड फोन्सवर (Android) whatsapp वापरता येणार नाही; त्यामुळे तुमचा फोन अपडेट नसेल तर तो तात्काळ अपडेट करून घ्या.

नवी दिल्ली : दरवर्षी जुन्या आयओएस (iOS) आणि स्मार्टफोन्सला (Smart Phone) मिळणारा सपोर्ट व्हॉट्सॲपचा (Whatsapp) कडून बंद करण्यात येतो. मागच्या वर्षी आयओएस 8 (iOS 8) आणि 2.3.7 या व्हर्जन्सवर चालणाऱ्या तसेच जुन्या अँड्रॉइड (Android) स्मार्टफोनवरील (Smart Phone) व्हॉट्सॲप सपोर्ट बंद केला होता.

2020 हे वर्ष संपण्यास काही दिवस शिल्लक असताना फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सॲपने (Whatsapp) जुन्या अँड्रॉइड स्मार्टफोन्स आणि आयओएसचा सपोर्ट बंद करणार असल्याचं जाहीर केलंय. यामुळे जुनी ऑपरेटिंग सिस्टिम असणाऱ्या अँड्रॉइड स्मार्टफोन आणि आयओएस फोन्समध्ये आता व्हॉट्सॲप (Whatsapp) सुविधा मिळणार नसल्याचं निश्चित झालं आहे. आता ios 9 आणि अँड्रॉइड 4.0.3 या ऑपरेटिंग सिस्टीम वरच (Operating System) व्हॉट्सॲप (Whatsapp) सुरू राहणार आहे.

व्हॉट्सॲपने (Whatsapp) आपल्या युझर्सला सर्व सेवांचा लाभ घेता यावा यासाठी ऑपरेटिंग सिस्टिमची नवी एडिशन (Edition) वापरण्यास सांगितले आहे. आयफोन्सवर (iphone) व्हॉट्सॲप (Whatsapp) वापरता यावे यासाठी आयएसओ 9 किंवा त्यापुढील ऑपरेटिंग सिस्टिमचा स्मार्टफोन तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तसेच अँड्रॉइड स्मार्टफोन (Android Smartphones) युझर्सला व्हॉट्सॲप वापरता यावे यासाठी त्यांच्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 4.0.3 किंवा त्यापुढील व्हर्जनची ऑपरेटिंग सिस्टिम असणे आवश्यक आहे. आज जुन्या आपरेटिंग सिस्टीमवर स्मार्टफोन्स चालत नसले, तरी कोणत्या विशिष्ट स्मार्टफोनवर हे मेसेजिंग ॲप चालणार नाही याबाबत माहिती असण्याचीही नितांत आवश्यकता आहे.

आयफोनचा विचार करता

आयफोन 4 पर्यंतच्या सर्व मॉडेल्सवर यापुढे हे ॲप चालू शकणार नाही. याचाच अर्थ जे ग्राहक आयफोन 4S, आयफोन 5, आयफोन 5S, आयफोन 6 आणि आयफोन 6S वापरतात त्यांनी आपल्या आयफोनवरील ऑपरेटिंग सिस्टीम आयओएस 9 वर अपडेट करुन घेतल्यास त्यांना व्हाटसअप वापरणे शक्य होईल.

अँड्रॉइडचा विचार केल्यास

जे युझर्स 4.0.3 पेक्षा जुन्या आपरेटिंग सिस्टिमवर आधारित स्मार्टफोन वापरत आहेत त्यांची व्हॉट्सॲप सुविधा बंद होणार आहे. परंतु, अनेक स्मार्टफोन्स यापेक्षा जुन्या आपरेटिंग सिस्टिमवर चालत नाहीत. तथापि, एचटीसी डिझायर, एलजी ऑप्टिमस ब्लॅक, मोटोरोला ड्राईड रेझर आणि सॅमसंग गॅलक्सी S2 या मॉडेल्सचा त्यात समावेश आहे. जे युझर्स जुन्या व्हर्जनवरील स्मार्टफोन वापरत आहेत त्यांना यावर्षीच्या अखेरपासून व्हॉट्सॲप सुविधेचा लाभ घेता येणार नाही.

मात्र जुन्या व्हर्जनवर पॅचसह अपडेट मिळाले तर काही युझर्स जुनी ऑपरेटिंग सिस्टीम असणाऱ्या स्मार्टफोनवरही व्हॉट्सॲप वापरु शकणार आहेत. अन्यथा या युझर्ससाठी नवा स्मार्टफोन खरेदी करणे हाच उपाय आहे.

अशी जाणून घ्या ऑपरेटिंग सिस्टिम

आयफोन युझर्स फोनमधील सेटिंग (Setting) – जनरल इन्फार्मेशन (Genaral Information) या ऑपन्शवर जाऊन सॉफ्टवेअरचे व्हर्जन (Software version) जाणून घेऊ शकतात. तसेच अँड्रॉइड युझर्स सेटींग (Setting) – अबाऊट फोन (About Phone) या ऑपन्शवर जाऊन सध्याच्या अँड्रॉइड व्हर्जनविषयी माहिती घेऊ शकतात.

व्हॉट्सॲप (Whatsapp) दरवर्षाच्या अखेरीस जुन्या स्मार्टफोनवरील सेवा बंद करते. गतवर्षी आयओएस 8 किंवा त्याहून जुन्या व्हर्जनच्या आयफोनवरील सेवा व्हॉट्सॲपने (Whatsapp) बंद केली होती. तसेच अँड्रॉइड 2.3.7 किंवा त्यापेक्षा जुन्या व्हर्जन असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोनवरील सेवा व्हॉट्सॲपने बंद केली होती.