एक लिटर पेट्रोलमध्ये तब्बल १५० चा मायलेज!; गाडीत करावा लागेल ‘हा’ छोटासा बदल

विवेक कुमार च्या मते, त्याच्या या टेक्निकमुळे बाइकचा एवरेज 150 किलोमीटर प्रतिलीटर होईल, जो साधारणपणे फक्त 50-60 चा एवरेज देते.

  युपीतील कौशांबी या जिल्ह्यात विवेक नावाच्या एका युवकाने एक असा पराक्रम केला आहे, जे ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. विवेक हा गुदङी या गावातील राहणारा मुलगा आहे. अहो, पण जर त्याचा हा कारनामा यशस्वी झाला तर ऑटोमोबाईल्स क्षेत्रासाठी चमत्कार ठरेल. तसे ही, आपल्या भारतातील लोकांना हे टेक्नॉलॉजीचे कारनामे करणे, काही अवघड नाही. कारण असे कारनामे तर आपल्याकडे लहानपणापासून करायला सुरुवात केली जाते. मग योग्य संधी मिळाली की आपल्या बुद्धीच्या जोरावर ते यशस्वी सुद्धा करतात.

  कौशांबी येथील गुदङी गावातील या विवेक कुमार पटेल याला 2001 मध्ये 12 वीत असताना फिजिक्स मध्ये एक फॉर्म्युला मिळाला होता. विवेकने सांगितले की, या फॉर्म्युल्याचा मी बाईक, जनरेटर आणि इतर वाहनांचा एवरेज वाढवण्यासाठी प्रयोग करून पाहिला. शेवटी तो यशस्वी ठरला.

  यासाठी विवेकने पिपरी, पहाङपुर या गावातील एका मिस्त्रीच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. तिथे त्याने जवळजवळ दोन वर्षे या फॉर्म्युल्यावर काम केले. या प्रयत्नांचे फळ त्याला तेव्हा मिळाले, जेव्हा उत्तर प्रदेश काऊंसिलिंग फॉर सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी आणि मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी इलाहाबाद ने प्रमाणित केले.
  विवेक कुमार च्या मते, त्याच्या या टेक्निकमुळे बाइकचा एवरेज 150 किलोमीटर प्रतिलीटर होईल, जो साधारणपणे फक्त 50-60 चा एवरेज देते. विवेकने सांगितले की, बाईक रिपेअरिंग शिकण्याच्या दरम्यान त्याने इंजिनातील बदलांमध्ये टेस्ट करायला सुरुवात केली. मग 2012 मध्ये बजाजची ङिस्कवर बाईक खरेदी केली.

  त्यानंतर त्याच्या इंजिनात बदल केले. या बदलामुळे त्याचा एवरेज ङबल झाला. अखेरीस विवेकच्या 17 वर्षांच्या मेहनतीला फळ मिळाले. त्याने सांगितले की, एवरेज वाढवण्यासाठी बाईक मध्ये असलेला कार्बोरेटर बदलून तो स्वतःचा कार्बोरेटर लावायचा. यासाठी त्याला 500 रु. खर्च यायचा.

  विवेक ला या कामासाठी काही जवळच्या लोकांनी मदत केली आहे. त्याने सांगितले की, कार्बोरेटर बनवण्यासाठी कंपनीला 75 लाख रुपयांची गरज आहे. तर त्याच्या या नवीन स्टार्टअपसाठी जम्मू काश्मीर मधील श्री माता वैष्णोदेवी युनिव्हर्सिटी च्या टेक्नॉलॉजी बिजनेस इंक्युबेशन सेंटरने त्याला या रकमेची मदत केली आहे.

  विवेक च्या कारनाम्याला इनोवेशनची मान्यता मिळाली आहे. युपीसीएसटीचे ङायरेक्टर राधेलाल यांच्या मते विवेकने पेट्रोल सप्लाय कमी करून एवरेज वाढवण्याची शक्कल लढवली आहे. या दरम्यान बाईकच्या मायलेज मध्ये खूप प्रमाणात वाढ झाली आहे.

  तसेच पेट्रोलच्या कमी वापराने इंजिन सुद्धा गरम होत नाही. त्यामुळे पेट्रोल जास्त लागत नाही. त्यामुळे स्पीड आणि पिकअप मध्ये देखील काही परिणाम झाला नाही. या टेक्निक चे मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी इलाहाबाद च्या मेकॅनिकल इंजिनियर ङिपार्टमेंट मध्ये टेस्टिंग करण्यात आले आहे.