world biggest iceberg a68a move forward to british overseas territory
ब्रिटिश बेटाला येऊन धडकणार जगातील सर्वात मोठा हिमनग, लाखो जीवावंर घोंगावतेय संकटाची टांगती तलवार

जगातील सर्वात मोठा हिमनग ब्रिटिश बेटावर येऊन धडकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असं झाल्यास लाखो जीवांचे आयुष्य संकटात सापडणार आहेत. बर्फाचा हा भलामोठा डोंगर २०१७ मध्ये यापासून वेगळा झाला होता.

नवी दिल्ली : अंटार्क्टिकाच्या जवळ असलेल्या ब्रिटिश बेटावर संकटाची टांगती तलवार आहे. या मागचं कारण आहे जागातील महाकाय हिमनग. या हिमनगाचे वजन १ ट्रिलियन टन आहे. युरोपची अंतराळ एजन्सी (ईएसए) नुसार १२ जुलै २०१७ मध्ये हा हिमनग अंटार्क्टिकाच्या महाकाय लार्सन सी समुद्रातील बर्फापासून वेगळा झाला होता.

या नंतर गेल्या महिन्याच्या मध्यावधीत दक्षिण अटलांटिकमध्ये दक्षिण ऑर्कनेजवळ दिसला होता. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मूळ जागेपासून वेगळा झाल्यानंतर आतापर्यंत याने १०५० किमीचा प्रवास केला आहे. या दरम्यान त्याचे अनेक तुकडे होऊन अन्य ठिकाणी विखुरले असले तरी याचा आकार आणि वजन अजूनही तसंच आहे.

ईएसएच्या माहितीनुसार, आजवर नोंदविण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठा हिमनग लक्‍जमबर्गच्या जवळपास दुप्पट आकार आणि वजनाचा आहे. कॉप‍रनिकस सेंटिनल-१ उपग्राहाच्या माध्यमातून सतत यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. बर्फाच्या या महाकाय पर्वताचे नाव ए-६८ आहे. वैज्ञानिक याच्या वेगळ्या झालेल्या भागांना ए, बी, सी असे नाव देतात. ५ जुलै २०२० रोजी या हिमनगाला तीन वर्ष पूर्ण झाल्यावरही उपग्रहाच्या सहाय्याने याचा आकार आणि वजनाबाबत माहिती घेतली आहे. इएसएने याच्या आता असलेला ठावठिकाणा काही दिवसांपूर्वीच सांगितला होता. यात हा एलिफंट आईसलँड पासून काही अंतरावर दिसला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

माहितीनुसार, जो जवळपास १६७ लांब आणि ३७ किमी रुंदीचा आहे. वैज्ञानिकांनी अशी शंका आहे की, जर हा हिमनग या बेटावर येऊन आदळला तर या ठिकाणी राहणारे हजारो पेंग्विन आणि सील मासे यांचे जीवन धोक्यात येऊ शकते. वैज्ञानिकांच्या मते या हिमनग बेटावर आदळल्याने हजारो जीवांच्या वास्तव्याच्या ठिकाणांवर प्रभाव पडणार असल्याचे म्हटले आहे. ईएसए नुसार, हा हिमनग जवळपास २०० मीटर खोल आहे. तथापि, अद्याप वैज्ञानिक हा हिमनग खरंच बेटावर आदळणार का? याबाबत अजून साशंक आहेत. वैज्ञानिकांच्या मते, काही वेळानंतर ते हे स्पष्ट सांगू शकतील की, वास्तवात हा बेटावर येऊन आदळणार की, नाही.

ईएसएनुसार, आजवर पाच महाकाय हिमनगांबाबत वैज्ञानिकांना माहिती आहे, पण हा त्याहूनही महाकाय आहे. यापासून वेगळे होणारे भाग एखाद्या जहाजावर जाऊन आदळले तर त्या जहाजाची अवस्था टायटानिकसारखीच होईल, जो आपल्या पहिल्यास समुद्र प्रवासा दरम्यान एका महाकाय हिमनगावर आदळून त्याला जलसमाधी मिळाली आहे. सेंडविच बेटाच्या जवळ पाण्याचे तापमान अधिक आहे असं वैज्ञानिकांचं मत आहे. अशातच त्या ठिकाणी जाऊन आदळल्याने आधीच अनेक भागात तो विखुरला जाईल. असं झालं तर समुद्री जीवांवर येणारं संकटही टळेल. जर हा हिमनग या बेटावर येऊन आदळण्यापूर्वी अनेक भागांत विखुरला तर काही प्रमाणात अशीही शक्यता आहे की, येत्या काही वर्षात हा वितळून नष्टही होईल.

ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेक्षणाचे जीवशास्त्राचे प्राध्यापक जेरायंट टार्लिंग यांचं असंही म्हणणं आहे की, यापासून निघणाऱ्या बर्फाच्या पाण्यामुळे मॉस आणि प्लॅक्टनच्या अस्तित्व धोक्यात येऊ शकते. याचा थेट परिणाम अशा समुद्री जीवांवर पडेल ज्यांचं अन्नपाणी याच्यावरच अवलंबून आहे. जर हा या बेटावर येऊन आदळला तर मोठ्या प्रमाणावर हवेत कार्बनडाय ऑक्साइडचे उत्सर्जनही होईल.

तथापि, या हिमनगामुळे फक्त नुकसानही होईल असंही नाही. वैज्ञानिकांच्या मते हा धूळ आणि गाळाने माखलेला असल्याने हा वितळल्याने समुद्राच्या पातळीत वाढ होईल. या बेटावर १७७५ साली ब्रिटनचे कॅप्टन जेम्स कुक यांनी दावा केला होता की, या ठिकाणी पेंग्विनच्या आणि प्रजाती वास्तव्यास आहेत. २० व्या शतकात या ठिकाणी व्हेल माशांची शिकारही करण्यात येत होती. आज या ठिकाणी ब्रिटीश अंटार्क्टिक सर्वेक्षण संशोधन केंद्र आहे. या ठिकाणी ३० वैज्ञानिकांचे वास्तव्य आहे.