Xiaomi कंपनीचा Mi 11 Lite लवकरच भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत

स्मार्टफोनमध्ये Snapdragon 732G प्रोसेसर दिला जाणार आहे. त्याचसोबत या डिवाइसमध्ये 6.55 इंचाचा एमोलेड डिस्प्ले आणि 4250mAh ची बॅटरी मिळणार आहे. जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. या व्यतिरिक्त डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यामध्ये पहिला 64MP चा प्रायमरी सेंसर, दुसरा 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल आणि तिसरा 5MP ची टेलिफोटो लेन्स दिली जाणार आहे.

    एमआय सीरिज अंतर्गत Mi 11 Ultra सह Mi 11X आणि Mi 11X Pro सारखे शानदार स्मार्टफोन ग्लोबल बाजारात उतरवण्यात आले आहेत. शाओमीचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्विटमध्ये Lite शब्दाचा वापर केला आहे. यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, हे डिवाइस Mi 11 Lite असणार आहे.

    शाओमी (Xiaomi) कंपनीचा अपकमिंग स्मार्टफोन Mi 11 Lite भारतात लॉन्च करण्याबद्दल प्रतीक्षा केली जात आहे. या आगामी स्मार्टफोन बद्दल काही रिपोर्ट्स सुद्धा लीक झाले आहेत. अशातच आता कंपनीच्या ग्लोबल VP आणि MD मनु कुमार जैन यांनी ट्विट करत एक डिवाइसच्या लॉन्चिंगचे संकेत दिले आहेत.