शाओमीने 67 वॅटचा चार्जर केला लाँच ; 5 प्रश्न-उत्तरांच्या माध्यमातून जाणून घ्या आपल्या किती आहे कामाचा, कुठे आणि कसा वापरता येणार?

67 वॅटच्या चार्जरसह 5000 mAh ची बॅटरी अवघ्या 36 मिनिटांत पूर्ण चार्ज करता येऊ शकते. अशा परिस्थितीत, Mi 11 अल्ट्रा स्मार्टफोन विकत घेतलेले वापरकर्ते याचाच वापर करू शकतात, कारण या फोनसोबत 55 वॅटचा चार्जर उपलब्ध आहे. हा चार्जर एका तासात 5000mAh ची बॅटरी चार्ज करतो.

  शाओमीने भारतीय बाजारात 67 वॅटचा सोनिकचार्ज 3.0 फास्ट चार्जर बाजारात आणला आहे. यासोबतच, 1 मीटर लांबीची USB टाइप-C केबलदेखील देण्यात येत आहे. हा एकच चार्जर सर्वांसाठी फ्यूल म्हणून काम करेल असे कंपनीचे म्हणणे आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन, लॅपटॉप, फिटनेस ट्रॅकर्स, स्मार्टवॉच, टॅब्लेट आणि अन्य USB टाइप-C उत्पादनांच्या चार्जिंगसाठी वापरता येईल. तथापि, एका वेळी फक्त एक डिव्हाइस चार्ज करता येऊ शकेल. चार्जरची किंमत 1,999 रुपये आहे. हा व्हाईट कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

  Mi 67 वॅट सोनिकचार्ज 3.0 चे Features

  हा चार्जर 67 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यात क्वालकॉमचे क्विक चार्ज 3.0 तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. गुणवत्ता, सुरक्षा आणि विश्वसनियतेचे मानदंड पूर्ण करण्यासाठी चार्जरमध्ये बिल्ट-इन सर्ज प्रोटेक्शन दिलं आहे. चार्जर 100-120Vचे इनपुट घेते आणि 67 67Wचा आउटपुट प्रदान करते. याची बॉडी पॉली कार्बोनेट सामग्रीपासून बनलेली आहे. त्याला ब्युरो ऑफ इंडियन सर्टिफिकेशन (BIS) प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

  बॅटरी 36 मिनिटांत पूर्ण चार्ज होणार

  कंपनी म्हणते की, 67 वॅटच्या चार्जरसह 5000 mAh ची बॅटरी अवघ्या 36 मिनिटांत पूर्ण चार्ज करता येऊ शकते. अशा परिस्थितीत, Mi 11 अल्ट्रा स्मार्टफोन विकत घेतलेले वापरकर्ते याचाच वापर करू शकतात, कारण या फोनसोबत 55 वॅटचा चार्जर उपलब्ध आहे. हा चार्जर एका तासात 5000mAh ची बॅटरी चार्ज करतो.

  चार्जरशी संबंधित काही महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे

  1. चार्जर सर्व प्रकारची डिव्हाइस चार्ज करणार?

  कंपनीचे म्हणणे आहे की, ज्या डिव्हाइसची बॅटरी क्विक चार्ज टेक्नॉलॉजीला समर्थन देते अशी डिव्हाइसेस फास्ट चार्ज होतील. तसेच, ज्यात USB टाइप-C पोर्ट आहे.

  2. नॉर्मल USB वाले डिव्हाइस चार्ज होतील का?

  होय, माइक्रो USB पोर्टला सपोर्ट करणारी डिव्‍हाइसेस देखील चार्ज होण्यास सक्षम असतील. यासाठी, युजर्स 67 वॅटच्या अ‍ॅडॉप्टरमध्ये त्यांच्या सामान्य चार्जर केबलचा वापर करू शकतात.

  3. या चार्जरद्वारे कोणती डिव्हाइसेस खराब होतील?

  हा एक क्विक चार्जर आहे जो डिव्हाइसमध्ये 67W चा आउटपुट देतो. हा 5 किंवा 10 वॅट चार्जिंगला सपोर्ट करणार्‍या डिव्‍हाइसेसशी कनेक्‍ट केला असल्यास त्या डिव्‍हाइसेसचे नुकसान होऊ शकते. चार्जिंगमुळे बॅटरी जास्त गरम होऊ शकते. डिव्हाइसचे इतर घटक खराब होऊ शकतात. डिव्हाइस फुटण्याची शक्यता देखील असू शकते.

  4. 50 वॅट चार्जिंग सपोर्ट डिव्हाइसचे काय होईल?

  ज्या डिव्‍हाइसेसना 25 ते 50 वॅट्स किंवा त्याहून अधिक चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे, त्यांना या चार्जरपासून धोका नाही. तथापि, चार्जिंग करताना ही डिव्हाइस बर्‍याच काळासाठी चार्जिंगसाठी ठेवली जाऊ शकत नाही. चार्जिंगच्या एका तासानंतर, डिव्हाइसमधून चार्जर अनप्लग करा.

  5. या चार्जरमुळे बॅटरी खराब होईल का?

  बॅटरी क्षमता आणि चार्जिंग तंत्रज्ञान काय आहे यावर निर्णय घेतला जातो. जर फोन या प्रकारच्या चार्जिंग तंत्रज्ञानास सपोर्ट करत नसेल तर फोनची बॅटरी खराब होण्याची शक्यता वाढते. कदाचित कंपनी फक्त त्या क्षमतेच्या चार्जरसह डिव्हाइस चार्ज करेल जे कंपनी त्याद्वारे देण्यात येते.

  भारतात मिळणारे टॉप-5 फास्ट चार्जर

  कंपनी वॅट
  वनप्लस वार्प चार्जर 65W
  स्टफकूल नेपोलियन PD  65 W
  बेसस GaN चार्जर 65 W
  बेसस USB PD चार्जर 45 W
  AMX XP60 45 W

  Mi 11 अल्ट्रामध्ये 67 वॅट चार्जिंग सपोर्ट

  कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi 11 अल्ट्रा या वर्षी एप्रिलमध्ये 67 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह लाँच करण्यात आला होता. कंपनी ग्लोबल व्हेरिएंटसह 67 वॅटचे चार्जरसुद्धा देत आहे, परंतु भारतीय व्हेरियंटमध्ये हा फोन 55 वॅटच्या चार्जरसह देण्यात आला आहे. फोन लॉन्च झाल्यानंतर अवघ्या महिनाभरानंतर कंपनीने 67 वॅटचे चार्जर एका ॲक्सेसरिज प्रमाणे लाँच करणार असल्याचे सांगितले होते.

  xiaomi mi 67w sonic charge 30 fast charger launched in india know the full story details

  तुम्हाला या बातमीविषयी काय वाटते? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा…