शाओमी फोन्समध्ये येणार रॅम वाढवण्याचे फिचर; MIUI 13 ची माहिती झाली लीक

आगामी MIUI 13 मध्ये शाओमी मेमरी फ्युजन टेक्नॉलॉजी देऊ शकते. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने युजर्स आपल्या मोबाईलच्या इंटरनल स्टोरेजचा वापर रॅम म्हणून करू शकतात. या अतिरिक्त वर्च्युल रॅमच्या मदतीने फोनमध्ये चांगली परफॉरमन्स आणि मल्टिटास्किंगचा अनुभव मिळेल. 

    Xiaomi सध्या आपल्या नेक्स्ट जेनेरेशन कस्टम युजर इंटरफेस MIUI 13 वर काम करत आहे. या आगामी युजर इंटरफेसमध्ये MIUI 12.5 च्या तुलनेत अनेक सुधारणा केल्या जातील. शाओमीने अजूनतरी या आगामी युजर इंटरफेसच्या लाँच बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

    आगामी MIUI 13 मध्ये शाओमी मेमरी फ्युजन टेक्नॉलॉजी देऊ शकते. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने युजर्स आपल्या मोबाईलच्या इंटरनल स्टोरेजचा वापर रॅम म्हणून करू शकतात. या अतिरिक्त वर्च्युल रॅमच्या मदतीने फोनमध्ये चांगली परफॉरमन्स आणि मल्टिटास्किंगचा अनुभव मिळेल.

    Xiaomi आपल्या आगामी CC 11 सीरिज आणि Mi MIX 4 सह कस्टम स्किन MIUI 13 लाँच करू शकते. शाओमीच्या या दोन्ही स्मार्टफोन सीरीज ऑगस्टमध्ये सादर केल्या जाऊ शकतात.