yahoo

एफडीआयच्या(FDI) नव्या (परकीय थेट गुंतवणूक) नियमांमुळे याहूने भारतातील त्यांच्या बातम्यांच्या वेबसाईट बंद(Yahoo Shuts Down News Websites In India) केल्या आहेत.

    मीडिया कंपन्यांच्या परदेशी मालकीला मर्यादित करणाऱ्या एफडीआयच्या(FDI) नव्या (परकीय थेट गुंतवणूक) नियमांमुळे याहूने भारतातील त्यांच्या बातम्यांच्या वेबसाईट बंद(Yahoo Shuts Down News Websites In India) केल्या आहेत. याहू न्यूज, याहू क्रिकेट, फायनान्स, एंटरटेनमेंट आणि मेकर्स इंडिया या वेबसाईट बंद करण्यात आल्या आहेत. मात्र याचा याहू ई-मेल आणि भारतातील सर्च इंजिनवर परिणाम होणार नाही. याहूने म्हटलंय की, २६ ऑगस्ट २०२१ पासून कंपनीने भारतात कोणत्याही प्रकारचा मजकूर प्रकाशित करणे बंद केले आहे.

    याहूने म्हटले आहे की, “याहू इंडिया २६ ऑगस्ट २०२१ पासून कोणतीही माहिती प्रकाशित करणार नाही. तुमचे याहू अकाउंट, मेल आणि सर्च यामुळे प्रभावित होणार नाहीत आणि नेहमीप्रमाणे काम करत राहतील. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि वाचकांसाठी आम्ही तुमचे आभार मानतो.”

    याहू वेबासाईटने पुढे म्हटले आहे की, “आम्ही निर्णय घाईमध्ये घेतलेला नाही. मात्र, भारतातील कायद्यांच्या बदलांचा परिणाम याहू इंडियावर झाला आहे. त्यामुळे आता भारतात डिजिटल कंटेंट पुरवणाऱ्या आणि प्रकाशित करणाऱ्या मीडिया कंपन्यांची परदेशी मालकी मर्यादित होत आहे. याहूचा भारताशी बराच काळ संबंध राहिला आहे. गेल्या २० वर्षांपासून युझर्सना आम्ही पुरवलेल्या प्रीमियम आणि स्थानिक मजकुराबद्दल आम्हाला अभिमान आहे. ”

    “याहू क्रिकेट बातम्या पुरवणारा एक घटक आहे. त्यामुळे त्यावरही नवीन नियमांचा परिणाम झाला आहे. एफडीआयच्या नवीन नियमांनी ‘न्यूज अँड करंट अफेयर्स’ स्पेसमध्ये भारतात डिजिटल कंटेंट चालवणाऱ्या आणि प्रकाशित करणाऱ्या मीडिया कंपन्यांच्या परदेशी मालकीवर मर्यादा आणल्या आहेत. तसेच जर तुम्ही याहू मेल वापरत असाल तर त्याचा तुमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच याहू या सर्च इंजिनवरही कोणताच परिणाम होणार नाही, त्या सेवा सुरु राहतील.” असं याहूने म्हटलंय.

    ऑक्टोबरमध्ये लागू होणाऱ्या नवीन एफडीआय नियमांनुसार, भारतातील डिजिटल मीडिया कंपन्या केंद्र सरकारच्या मंजुरीच्या अधीन राहून परकीय गुंतवणुकीच्या स्वरूपात २६ टक्के गुंतवणूक स्वीकारू शकतात.