तुम्हाला लसीकरणासाठी ‘या’ सुविधा मिळणार एका क्लिकवर; Facebook भारतात लाँच करणार Vaccine Finder टूल, वाचा सविस्तर

फेसबुक भारतातील स्वयंसेवी संस्था आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या एजन्सींना जाहिरातीचं श्रेय आणि इनसाईटला समर्थन देत आहे, जे फेसबुकवर अनेक लोकांपर्यंत कोविड-19 वॅक्सिन आणि आवश्यक आरोग्यासंबंधी माहिती पुरवत आहेत. तसंच ते युनिसेफ इंडियासोबत लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी काम करत आहेत, जेणेकरुन आपत्कालीन वेळी आणि घरी कोरोनाची हलकी लक्षणं दिसल्यास कशाप्रकारे खबरदारी घ्यावी याबाबत माहिती दिली जाईल.

  नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढतेच आहे. या कठीण काळात भारताच्या मदतीसाठी अनेक देशांसह मायक्रोसॉफ्ट, गुगल, अ‍ॅपल या कंपन्याही पुढे सरसावल्या आहेत. आता फेसबुकही (Facebook) लसीकरणासाठी (Vaccination) भारत सरकारला (Govt of India) मदत करत आहे. फेसबुकने भारत सरकारशी मिळून लसीकरणाबाबत एक असं टूल तयार केलं आहे, ज्याचा वापर करुन लोकं हे जाणून घेऊ शकतात, की त्यांच्या जवळपास कुठे लस, लसीकरण केंद्र उपलब्ध आहे.

  फेसबुकने शुक्रवारी भारतात आपल्या मोबाईल अ‍ॅपवर ‘वॅक्सिन फाइंडर’ (Vaccine Finder) टूल रोल आउट करण्याची घोषणा केली.  भारत सरकारच्या भागीदारीत हे टूल विकसित करण्यात आलं आहे. 17 स्थानिक भाषांमध्ये हे टूल उपलब्ध होईल. लस मिळवण्यासाठी हे टूल लोकांना जवळपासची ठिकाणं शोधण्यास मदत करणार आहे.

  लसीकरणासाठी अपॉईंटमेंटही घेता येईल

  आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या डेटाचा वापर करुन लसीकरण केंद्रांविषयी आणि त्यांचा कालावधी याबद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी या टूलचा वापर होईल. या टूलमध्ये वॉक-इन ऑप्शनही मिळेल आणि लसीकरणाच्या अपॉईंटमेंटसाठी अधिकृत कोविड लसीकरण पोर्टल CoWin वर रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक लिंकही दिली जाईल. हे टूल फेसबुकवर Covid-19 Information Centre मध्ये उपलब्ध आहे.

  येथे मिळणार माहिती

  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक भारतातील स्वयंसेवी संस्था आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या एजन्सींना जाहिरातीचं श्रेय आणि इनसाईटला समर्थन देत आहे, जे फेसबुकवर अनेक लोकांपर्यंत कोविड-19 वॅक्सिन आणि आवश्यक आरोग्यासंबंधी माहिती पुरवत आहेत. तसंच ते युनिसेफ इंडियासोबत लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी काम करत आहेत, जेणेकरुन आपत्कालीन वेळी आणि घरी कोरोनाची हलकी लक्षणं दिसल्यास कशाप्रकारे खबरदारी घ्यावी याबाबत माहिती दिली जाईल.

  ही माहिती फेसबुकच्या Covid-19 इन्फॉर्मेशन सेंटर आणि याच्या न्यूड फीडमध्ये उपलब्ध आहे. इन्स्टाग्रामवर कंपनी ‘Explore’ सेक्शनमध्ये ‘Guide’ च्या माध्यमातून ही माहिती पोहोचवत आहे.