सीमोल्लंघन

सीमोल्लंघनकोरोनामुळं पर्यटन, जंगल सफारीला मोठा फटका; अनलॉकमुळं आता पुन्हा पर्यटन क्षेत्राला सोनेरी दिवस?
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळं पर्यटन व्यवसायाची 'न भूतो, न भविष्य' अशी हानी झाली. साहजिकच या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या मोठ्या वर्गाला याचा आर्थिक फटका बसला आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पर्यटन व्यवसायाचा हिस्सा ९.२ टक्के, तर जगाच्या जीडीपीत दहा टक्के इतका आहे. भारतात सुमारे २.६७ कोटी जणांना पर्यटनातून रोजगार मिळतो. २०१८ या वर्षात पर्यटन व्यवसायातून भारताला २८.६ अब्ज डॉलरची कमाई झाली होती. परंतू कोरोनाने हाहाकार माजवल्यामुळं मागील दिड वर्षापासून पर्यटन व्यवसाय ठप्प झाला होता. यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बरोजगाराची कुऱ्हाड कोसळली होती, त्यामुळं त्यांना उपासमारीला सामोरी जावे लागले होते. पण आता शासनाने ‘पुनश्चय हरि ओम म्हणत’ अनेक क्षेत्राना खुले करण्याची परवानगी दिली आहे. पर्यटन क्षेत्र १ ऑक्टोबरपासून खुलं करण्यात आले आहे. त्यामुळं आपण ‘पर्यटन आणि जंगल सफारी’मध्ये सुद्धा ‘सीमोल्लंघन’ करत आहोत.