संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मागील वर्षीचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये न घेता आवश्यत ती खबरदारी घेऊन हा मेळावा शिवाजी पार्कसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला होता. कोरोनाचे नियम पाळून केवळ 50 जणांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला होता.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा गतवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला होता. तसेच, मुख्यामंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईनने शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. मात्र, यंदाच्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने मेळावा होणार नसून, प्रत्यक्ष मेळावा घेण्यावर चर्चा सुरू आहे. आणि याबाबत अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मागील वर्षीचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये न घेता आवश्यत ती खबरदारी घेऊन हा मेळावा शिवाजी पार्कसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला होता. कोरोनाचे नियम पाळून केवळ 50 जणांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन माध्यमातून शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. मात्र, यावेळी हा मेळावा जाहीर होणार आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. त्याबाबत तयारी सुरु आहे.

    लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी राहुल गांधी यांची राऊतांनी काल भेट घेतली. या पार्श्वभूमीवर आज ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांना दसरा मेळावा होणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, दसरा मेळावा नक्कीच होईल आणि तो ऑनलाईन पद्धतीने होणार नाही हे निश्चित. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन दसरा मेळाव्यासंबंधित निर्णय घेण्यात येईल.