कोरोनाकाळातील सिनेमागृहांची अवस्था आणि मोठ्या प्रमाणात झालेलं आर्थिक नुकसान

२२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे आरोग्याचे नियम पाळून खुली होत आहेत. तसेच ५० टक्क्यांच्या मर्यादेसह ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुद्धा  सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मागील दिड दोन वर्षापासून बंद असणाऱ्या चित्रपटसृष्टीला देखील कोरोनामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. कोरोनाकाळात दिल्ली, मुंबई, कर्नाटक, केरळ, जम्मू आणि काश्मीरसह अनेक राज्यातील सिनेमागृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळं प्रदर्शित झालेल्या सिनेमांना तसेच प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांचे मोठं नुकसान झाले होते. कोरोनामुळं अनेक मोठ्या कलाकारांनी आपले प्लॅन बदलले होते. अनेक सिनेमांचं शूटिंग थांबवण्यात होतं. कित्येक सिनेमांची रिलीज डेटही पुढे (पोस्टपॉंड) ढकलण्यात आली होत्या. आयफा आणि झी सिनेमा अवॉर्ड्ससारखे भारतातले मोठे चित्रपट पुरस्कार सोहळे सुद्धा रद्द करण्यात आले होते. तसेच शूटिंग सुद्धा बंद करण्यात आले होते. त्यामुळं कोरोनाचा प्रचंड आर्थिक फटका आणि मोठ्या प्रमाणात नुकसान चित्रपटसृष्टीला भोगावे लागले.

    देशात कोरोनाच्या आगमनापासून ते आतापर्यंत मनोरंजन क्षेत्र म्हणजे सिनेमागृह बंद ठेवण्यात आले होते. पण कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळं आता राज्य सरकारनं शाळा, मंदिरं, मॉल यानंतर राज्यातील सिनेमागृह सुरु करण्यासही परवानगी दिली आहे. त्यामुळं २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे आरोग्याचे नियम पाळून खुली होणार आहेत, त्यामुळं कलाकार, निर्माते, प्रेक्षक, तसेच या क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला आहे. आता आपण कोरोनाच्या संकटावर मात करत, ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. आता हळूहळू सकारात्मक बदल होत आहे. मागील दिड दोन वर्षापासून बंद असणारा सिनेमा आता प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. मनोरंजन या क्षेत्रातून सरकारला महसूल मोठ्या प्रमाणात मिळतो. तसेच अनेक कर्माचाऱ्यांच्या हाताला रोजगार सुद्धा मिळतो. त्यामुळं मागील दिड दोन वर्षात मनोरंजन या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत, मोठया आर्थिक फटक्याला सामोरं जावे लागले आहे. परंतू आता आपण या क्षेत्रात सुदधा ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. नियमावली पाळत, आरोग्याची काळजी घेत, सकारात्मक पाऊल पुढे टाकत आहोत. त्यामुळं येणार काळ हा या क्षेत्रासाठी नक्कीच चांगला असेल. कोरोनाच्या काळात मागील दिड दोन वर्षात सिनेमागृह आणि चित्रपटसृष्टीत काय घडलं? कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं? याचा आपण मागोवा घेणार आहोत.

    कोरोनाचा फटका सिनेमांना आणि सिनेमागृहांना

    सिनेमा एकाच वेळेस आलिशान मल्टिप्लेक्समध्ये पण चालू अस,तो आणि त्याचवेळेस एखाद्या खेड्यात भरलेल्या जत्रेतही तो सुरू असतो. तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये निवांत टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर तो पाहू शकता, त्याचवेळेस भरगच्च भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर पण बघू शकता. पण याच सिनेमाच्या फिरणाऱ्या रिल कोरोनामुळं ठप्प झाल्या होत्या. २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे आरोग्याचे नियम पाळून खुली होत आहेत. तसेच ५० टक्क्यांच्या मर्यादेसह ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुद्धा  सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मागील दिड दोन वर्षापासून बंद असणाऱ्या चित्रपटसृष्टीला देखील कोरोनामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. कोरोनाकाळात दिल्ली, मुंबई, कर्नाटक, केरळ, जम्मू आणि काश्मीरसह अनेक राज्यातील सिनेमागृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळं प्रदर्शित झालेल्या सिनेमांना तसेच प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांचे मोठं नुकसान झाले होते. कोरोनामुळं अनेक मोठ्या कलाकारांनी आपले प्लॅन बदलले होते. अनेक सिनेमांचं शूटिंग थांबवण्यात होतं. कित्येक सिनेमांची रिलीज डेटही पुढे (पोस्टपॉंड) ढकलण्यात आली होत्या. आयफा आणि झी सिनेमा अवॉर्ड्ससारखे भारतातले मोठे चित्रपट पुरस्कार सोहळे सुद्धा रद्द करण्यात आले होते. तसेच शूटिंग सुद्धा बंद करण्यात आले होते. त्यामुळं कोरोनाचा प्रचंड आर्थिक फटका आणि मोठ्या प्रमाणात नुकसान चित्रपटसृष्टीला भोगावे लागले.

    सिनेमांच्या तारखा पोस्ट पॉन्ड, परदेशी शूटिंगला बंदी

    दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, त्यावेळी अनेक प्रदर्शित होणारे चित्रपट यांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या. ‘सूर्यवंशी’ या सिनेमाची रिलीज डेट चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी रद्द केली होती. कोरोनाचा धोका टळत नाही, तोपर्यंत सिनेमा रिलीज करणार नाही, असं रोहित शेट्टीनं म्हटलं होतं. या सिनेमात अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह यासारखे दिग्गज स्टारकास्ट असल्याने हा यावर्षीचा सर्वात मोठा सिनेमा मानला जातोय. सिनेमावर खूप पैसा खर्च झाल्याने नुकसान होऊ नये, म्हणून रोहित शेट्टींनं ही भूमिका घेतल होती. कोरोनाचा परिणाम परदेशी शूटिंगवर सुद्धा झाला. झोया अख्तर आणि रीमा कागती यांची अमेझॉन प्राईमवरची ‘मेड इन हेवन’ ही वेबसीरिज बरीच लोकप्रिय झाली. याच्या पार्ट 2चं शूटिंग युरोपात होणार होतं. मात्र, हे शूटिंग सुद्धा रद्द करण्यात आलं होतं. शूटिंग रद्द होणं निराशाजनक असल्याचं या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शोभिता धुलिपालने सांगितलं. ‘सितारा’ या सिनेमावरही कोरोनाचा परिणाम बघायला मिळला होता. केरळमध्ये या सिनेमाचं शूटिंग होणार होतं. तेही रद्द करण्यात आलं होत. तसेच सलमान खानच्या ‘राधे’ सिनेमाचं शूटिंगही काही काळ रद्द करण्यात आलं होतं.  अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ सिनेमाचं शूटिंग रदद करण्यात आलं. करण जोहरच्या ‘तख्त’ सिनेमाचं जयपूर आणि जयसलमेरमध्ये होणारं शूटिंगही रखडलं होतं. ‘भुलभुलैया 2’ सिनेमाचं शूटिंग सुद्धा रद्द करण्यात आलं होतं. कोरोनाचा धोका वाढत असल्यानं सर्वच सिनेमांचं शूटिंग रद्द करण्यात आलं होतं.

    चित्रपटसृष्टीतील कर्मंचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

    चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणात रोजंदारीवर अनेकांच्या हाताला काम मिळते. परंतू कोरोनाच्या काळात शूटिंग बंद असल्यामुळं या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. मेकअप आर्टिस्ट, ज्युनिअर आर्टिस्ट, स्पॉट बॉय, लाईटमन, कॅमरामन तंत्रज्ञ यासारख्या अनेक कर्मचारी वर्गांला कोरोनाचा फटका बसला. दरम्यान या कालावधीत सरकारनं या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी सुद्धा झाली होती. दरम्यान यावेळी अनेक निर्मात्यांनी उदा. प्रशांत दामले, एकता कपूर आपल्या सोबत काम करणाऱ्या लोकांना स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत केली होती. कोरोनाविरुद्धची लढाई जितकी आर्थिक आणि शारीरिक होती किंवा आहे. तितकीच किंबहुना किंचित जास्त मानसिक आहे. यावेळी अनेक क्षेत्रातल कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे निर्देश दिले होते, (वर्क फॉर्म होम) मात्र, हे कर्मचारी तर घरून काम करू शकत नाहीत. काम मिळालं नाही तर त्यांच्या उदरनिर्वाह कसा चालणार? या विवेचंनेत हे कर्मचारी राहिले. हाताला काम नसल्यामुळ स्वाभाविकपणे कित्येक चित्रपटसृष्टीतील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती.

    निर्मांत्यांसह कलाकारांनाही काळजी

    कोरोनाच्या परिस्थितीमुळं निर्मात्यांसह दिग्गज कलाकारांनी चिंता व्यक्त केली होती. सिनेमांमध्ये ज्या निर्मात्यांनी पैसे लावले होते, ते चित्रपट प्रदर्शित होऊ न शकल्यामुळं निर्मात्यांचे आर्थिक गणित बिघडले. त्यामुळं कोरोना कधी संपेल आणि चित्रपटसृष्टीतील चक्रं केव्हा फिरतील? आणि आम्हांला उभारी केव्हा मिळेल? अशी काळजी निर्मात्यांना व्यक्त केली होती. तर कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे मनोरंजन उद्योगाला जोरदार फटका बसला आहे. अनेक मोठे मराठी चित्रपट लांबणीवर गेले आहेत. अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत मराठी मनोरंजनसृष्टी कुठे उभी आहे? अशी चिंता चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील कोरोनाच्या परिस्थितीवर भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच अनेक कलाकरानी कोरोनामुळं उदभवलेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती.

    कोरोनाकाळात सिनेमागृहातील मालकांना कोरोनाचा मोठा फटका सहन करावा लागला. ‘बागी ३’ आणि ‘अंग्रेजी मीडियम’ यासारख्या सिनेमांवरही कोरोनाचा परिणाम झालेला दिसला. फिल्म मार्केट एक्सपर्ट अमोद मेहरा म्हणाले की, “कोरोनाचा बॉलिवुडवर आधी एवढा परिणाम झाला नव्हता. मात्र, कोरोनामुळं जास्त फटका बसला आहे. सरकारने आधी दिल्ली, केरळ, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीरमधली चित्रपटगृहं बंद ठेवण्याचे आदेश दिले होते आणि आता मुंबईतली चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बिकट होईल. चित्रपट प्रदर्शितच झाला नाही तर चित्रपटगृह मालकांचं आर्थिक नुकसान होईल. त्यांना मोठा धक्का बसेल, असं निर्माते आणि कलाकारांनी म्हटले होते.  

    कोरोनाकाळात ओटीटीला प्रेक्षकांची पसंती

    कोरोनाकाळात सिनेमागृह बंद असल्यामुळं प्रेक्षकांनी घरच्या घरी आपल्या मोबाईलवर ओटीटी प्लटफॉर्मवर अनेक चित्रपट प्रेक्षकांनी पाहिले. यामध्ये वेबसिरीज, शॉर्ट फिल्म इत्यादी, ओटीटी प्लटफॉर्मला पसंती दिली होती. कोरोनाकाळात ओटीटीकडे वळलेला प्रेक्षक पुन्हा चित्रपटागृहांकडे वळविण्याचे मोठे आव्हान चित्रपटसृष्टीपुढे आहे. त्यामुळे चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा दोन महिने अंदाज घेऊनच निर्माते नवीन चित्रपट प्रदर्शित करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे येणाऱ्या नववर्षातच मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. गेल्या दीड वर्षात जवळपास दोनशेहून अधिक मराठी सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. कोरोना महामारीमुळे या चित्रपटांचे प्रदर्शन रखडले होते. अनेक निर्मात्यांनी कर्ज काढून चित्रपटांची निर्मिती केली; परंतु प्रदर्शनाअभावी निर्मात्यांचे आर्थिक दिवाळे निघाले आहेत. त्यामुळे बहुसंख्य निर्माते ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. त्यामुळं ओटीटीचा प्रेक्षकवर्ग पुन्हा सिनेमांकडे कसा वळवायचा हे आव्हान आता सिनेमापुढे आहे.

    कर्मचारी वर्गांसाठी आर्थिक नियोजन गरजेचं

    कोरोनाच्या संकटानतर आता सिनेमाला पुन्हा लोकांमध्ये रुजविण्यासाठी आणि उभा करण्यासाठी नक्कीच वेळ लागणार आहे. सिनेमा हा जगण्यासाठी, टिकून राहण्यासाठी आता तरी दीर्घकालीन विचार करणे गरजेचे आहे. भविष्यात असे कोरोनासारखे कोणतेही संकट आले तरी, मनोरंजन या क्षेत्रात कोणावरही उपासमारीची, आत्महत्येची वेळ येऊ नये, याची काळजी घेणारी दीर्घकालीन योजना आखणे गरजेचे आहे. या कामासाठी सिनेउद्योगासह सरकारने, सांस्कृतिक मंत्रालयाने लक्ष देणे गरजेचे आहे. पडद्यावर दिसणारे आणि पडद्यामागे न दिसणारे या साऱ्यांसाठी संकटकाळात उपयोगी पडेल, अशी व्यवस्था उभी करणे अत्यावश्यक आहे. विमा योजना, पेन्शन योजना, समाजकल्याण अशा अनेक माध्यमातून हे दीर्घकालीन नियोजन व्हायला हवे. किमान मनोरंजन उद्योगातील सगळ्यांचा नीट डेटा उपलब्ध असायला हवा. या साऱ्यांपर्यंत संकटकाळात पोहचता यायला हवे. त्यांसाठी सर्वांनी मिळून उभी केलेली यंत्रणा असावी. या यंत्रणेच्या माध्यमातून मिळणारी मदत, ही फक्त कोरोनासारख्या संकटकाळातच नव्हे, तर अपघात, आजारपण, निवृत्ती अशा अनेक प्रसंगामध्ये या मनोरंजन क्षेत्राला दिलासादायक ठरेल. आणि येथे काम करणाऱ्या कर्मचारी वर्गांला आर्थिक मदत मिळेल. कोरोनाकाळात कॅनडा, ग्रेट ब्रिटन यासारख्या अनेक देशांनी त्यांच्या देशातल्या मनोरंजन क्षेत्राला घसघशीत पॅकेजेस दिली आहेत. लोकसंख्येचा विचार करता, आपल्याकडे तसे होण्याची शक्यता नाही. मोठ्या लोकसंख्येमुळे, रुग्णांच्या मोठ्या संख्येमुळे आणि असंघटित क्षेत्रात मोठे मनुष्यबळ असल्यामुळे आपल्या सरकारांसमोरची आव्हाने आधीच मोठी आहेत. अगोदरच ताणली गेलेली अर्थव्यवस्था, आटलेले आर्थिक स्रोत यामुळे मेटाकुटीला आलेल्या आपल्या केंद्र किंवा राज्य सरकारने मनोरंजन क्षेत्राला विशेष पॅकेज द्यावे, ही अपेक्षा बाळगणेच चुकीचे ठरेल. पंरतू या क्षेत्रात काम करत असलेले कर्मचारी यांच्यासाठी आर्थिक नियोजन होणे गरजेचं आहे.

    कोरोनानंतरचा सिनेमा

    २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे आरोग्याचे नियम पाळून खुली होणार आहेत. परंतू समजा सिनेमागृह सुरु झाल्यानंतर तरी संसर्गाच्या भीतीने किती प्रेक्षक सिनेमागृहात येतील याबद्दल शंका आहे. ज्यांचे सिनेमे तयार आहेत किंवा निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत, अशा सिनेमांच्या निर्मात्यांची कुचंबणा होत आहे. यातल्या अनेकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर डायरेक्ट सिनेमे प्रदर्शित करण्याचा मार्ग चोखाळला. शूटिंग आणि नवीन सिनेमांचे प्रदर्शन थांबल्यामुळे देशातील मनोरंजन क्षेत्राला बसलेला आर्थिक फटका एक हजार कोटींच्यावर आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सिनेमागृहे उघडली तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद जोपर्यंत मिळत नाही तोवर निर्माते चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस दाखविणार नाहीत. गेल्या दीड वर्षातले दोनशेपेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत, पण “चित्रपट प्रदर्शित करणं एवढी सोपी गोष्ट नाही. प्रसिद्धी साहित्य, जाहिराती यावर खूप खर्च होतो. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळण्याची निर्मात्यांना खात्री नाही. प्रेक्षक कितपत साथ देतील त्यावर सर्व अवलंबून असल्याचं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितलं आहे.

    “शासनाने २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे १ ऑक्टोबरपासून सर्व कर्मचारी कामावर बोलावणार आहेत. शासनाने अजून नियमावली जाहीर केलेली नाही. ती आली की, त्यानुसार नियोजन केले जाईल. दिवाळीमध्येच नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. आम्ही रंगीत तालीम म्हणून दोन आठवडे आधीच चित्रपटगृह सुरू करणार आहोत असं सिटीप्राईड मल्टिप्लेक्सक्सचे अरविंद चाफळकर म्हणाले आहेत” ” त्यामुळं कोरोनानंतर जरी आपण ‘सीमोल्लंघन’ करत असलो तरी, निर्माते आणि सिनेमागृहाचे मालक अजूनही काळजीत आहेत. मागील दिड दोन वर्षाच्या कालावधीनंतर सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, त्यामुळं आपण जरी ‘सीमोल्लंघन’ करत असलो तरी, आरोग्याची काळजी सुद्धा घेणं महत्त्वाचं आहे. सिनेमाला उभारी घेण्यासाठी निश्चितच थोडा वेळ लागेल. पण भविष्यात चित्रपटांना ‘अच्छे दिन’ येतील यात शंका नाही.